राहुल गांधी म्हणाले, ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते!

कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे महत्व पटवून देताना राहुल गांधी यांनीसिंधियांच्या भाजप प्रवेशावर थेट हल्ला चढविला.
Jyotiraditya scindia could have become cm with congress says rahul gandhi
Jyotiraditya scindia could have become cm with congress says rahul gandhi

नवी दिल्ली : यूथ विंगच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या अत्यंत जवळच्या पण आता भाजपमध्ये गेलेल्या नेत्याला चांगलेच खडे बोल सुनावले. भाजपचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना उद्देशून बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ''तुम्ही काँग्रेसमध्ये असता तर मुख्यमंत्री झाला असता, पण आता मागच्या खूर्चीवर बसावे लागत आहे." 

कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे महत्व पटवून देताना त्यांनी सिंधियांच्या भाजप प्रवेशावर थेट हल्ला चढविला. ते म्हणाले, सिंधिया यांच्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत काम करून संघटनेला अधिक मजबूत करण्याचा पर्याय होता. मी त्यांना म्हणालो होतो की, एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री व्हाल. पण त्यांनी वेगळी वाट निवडली. आता लिहून घ्या, ते तिथे कधीही मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. त्यांना त्यासाठी इथेच यावे लागेल."

राहुल गांधी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारे विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडून तरूण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ते राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच मध्य प्रदेशातील काँग्रेसची सत्ता गेली. सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा देत भाजपला साथ दिली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही या आमदारांना यश मिळाले. 

सिंधिया आणि तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून ते नाराज होते. तसेच राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतरही त्यांच्याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप होता. सत्तेत त्यांच्या समर्थक आमदारांना डावलले गेले. कमलनाथ यांच्याकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 

सिंधिया हे राहुल गांधींचे खंदे समर्थक मानले जात होते. राहुल यांच्या यंग ब्रिगेडमधील ते अत्यंत जवळचे होते. आपल्याला भेटण्यासाठी अपाॅईंटमेंटची गरज नसलेल्या नेत्यांमध्ये ज्योतिरादित्य यांचा समावेश असल्याचे राहुल यांनीच सांगितले होते. 

Edited By Rajanand More 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com