भाजपची बाजू मांडणारे वकीलच आता न्यायाधीश; ममतांचा जय-पराजय ठरवणार

ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी होणार होती.
Justice Kaushik Chanda appeared for BJP before High Court
Justice Kaushik Chanda appeared for BJP before High Court

कोलकता :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नंदीग्राम (Nandigram) विधानसभा मतदारसंघातील निकालाला कोलकता उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या मतदारसंघातून भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममतांचा पराभव केला आहे. न्यायालयात गेल्यानंतरही आता या वादात आणखी भर पडली आहे. या वादामध्ये आता थेट न्यायाधीशांनाच ओढण्यात आले आहे. (Justice Kaushik Chanda appeared for BJP before High Court)

ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी होणार होती. पण न्यायालयाच्या एक सदस्यीन खंडपीठाने 24 जूनपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली. सुनावणी पुढे गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसने थेट न्यायाधीशांविरोधातच मोर्चा उघडला. तृणमूलच्या नेत्यांनी न्यायमूर्ती कौशुक चंदा यांचे भाजपच्या व्यासपीठावरील छायाचित्र ट्विटर देत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. 

कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांनी कौशिक चंदा यांना ममतांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी नियुक्त केलं आहे. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी भाजपच्या नेत्यांसोबत चंदा यांचे छायाचित्र ट्विट केले आहे. त्यामध्ये भाजपचे बंगाल प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष चंदा यांच्यासोबत व्यासपीठावर दिसत आहेत. 

घोष यांच्यासह तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही दोन छायाचित्र ट्विट केली आहेत. 'दोन्ही छायाचित्रात दिसणारी व्यक्ती कोण आहे? कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कौशुक चंदा आहेत का? त्यांना नंदीग्राम निवडणूक प्रकरणाच्या सुनावणीसाठी नियुक्त केलं आहे का? न्यायपालिका इतकी खालच्या पातळीवर जाऊ शकते?,' असं ओब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ओब्रायन यांनी आणखी एक ट्विट केलं असून त्यांनी कौशिक चंदा वकील असताना कोलकता उच्च न्यायालयात भाजपची बाजू मांडल्याची माहिती दिली आहे. 'न्यायमुर्ती कौशुक चंदा यांनी उच्च न्यायालयासमोर भाजपची बाजू मांडलेली ही प्रकरणे आहेत. आता त्यांना नंदीग्राम निवडणूक निकाल प्रकरणाच्या सुनावणीची जबाबदारी देण्यात आली आहे,' असे ओब्रायन यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com