भाजपच्या तीन नेत्यांची हत्या करणाऱ्याला अटक...

दहशतवादी झहूर अहमद राठेर उर्फ साहिल उर्फ खालिद याला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे.
t14.jpg
t14.jpg

जम्मू : पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असणाऱ्या दि रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या गटाचा सदस्य असलेला दहशतवादी झहूर अहमद राठेर उर्फ साहिल उर्फ खालिद याला जम्मू पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षी दक्षिण काश्‍मीरमध्ये झालेल्या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी तो सुरक्षा आणि तपास यंत्रणांना हवा होता.

झहूर अहमद राठेर याने काही वर्षांपूर्वी पाकव्याप्त काश्‍मीरात जाऊन दहशतवादाचे आणि शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. दक्षिण काश्‍मीर परिसरात वास्तव्यास असलेला झहूर पाकिस्तानातून पाठवला जाणारा शस्त्रसाठा स्वीकारण्यासाठी जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यात गेला. येथे तो राहत होता.

राठेऱ याने 2004 मध्ये पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते. 2006 मध्ये तो पोलिसांनी शरण आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा पोलिस आणि राजकीय व्यक्तींची हत्या करण्यास सुरवात केली होती. भाजपचे नेते फिदा हुसैन यातू, उमर राशिद बेग आणि उमर रमजान हजम कुलगाम या तिघांची गेल्या वर्षी 29 आँक्टोबर रोजी हत्या झाली होती. या हत्येशी राठेर यांचा संबध असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने कुलगाम येथे एका पोलिसांची हत्या केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

राठेर अनंतनाग येथील राहणारा असून 2002 मध्ये तो हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी झाला होता. याच दरम्यान तो पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी गेला होता. पाकिस्तानातून शस्त्रसाठा आणणे, तरूणांना दहशतवादी प्रशिक्षण देणे, गुन्हेगारी अशा स्वरूपाच्या गुन्हात तो पोलिसांना हवा होता.  

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लष्कर-ए-मुस्तफा या गटाचा स्वयंघोषित म्होरक्‍या हिदायतुल्ला मलिक याला अटक केली. काही दिवसापूर्वी दोन खतरनाक दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात सापडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना त्यांच्या साथीदारांपर्यंत पोहचणे शक्‍य होणार आहे.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com