माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांना घरातच नजरकैद केले.. - jammu kashmir omer abdullah farooq abdullah under house arrest mehbooba mufti pulwama | Politics Marathi News - Sarkarnama

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांना घरातच नजरकैद केले..

वृत्तसंस्था
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

उमर अब्दुला यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेता फारूक अब्दुल्ला आणि त्याचे चिंरजीव उमर अब्दुल्ला यांना आज नजरकैद करण्यात आले आहे. त्यांना पुलवामा जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. उमर अब्दुला यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख महेबुबा मुक्ती यांनाही काल पुलवामा येथे जाण्यावर बंदी केली होती. 

उमर अब्दुल्ला यांच्या घरासमोर पोलिसांनी सरंक्षणासाठी गाडया उभ्या केल्या आहेत. उमर हे आज गुलमर्ग येथे जाणार होते तर त्यांचे वडील फारूक अब्दुल्ला हे काश्मीर घाटी येथील गांदरबल परिसरात जाणार होते. पण या दैाघांचा दैारा पोलिसांनी रद्द केला असून त्यांना त्यांच्या घरातच नजरकैद  करण्यात आले आहे. 
 
नेशनल कॉन्फ्रेंस चे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, आँगस्ट 2019 नंतरचा हा जम्मू काश्मीर आहे. आम्हाला न सांगता आमच्या घरात कैद केलं आहे. मला आणि माझे वडील खासदार फारूक अब्दुल्ला यांना आमच्या घरात कैद केलं आहे, ही फार चुकीची बाब आहे. याचप्रकारे माझी बहीण आणि तिच्या मुलांना देखील त्यांच्या घरात कैद करण्यात आले आहे. 

पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्याच्या घटनेचा आज स्मृतीदिन आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे केलं असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. दोन वर्षापूर्वी पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या जवानांना घेऊन निघालेल्या बसला धडक दिली. या धडकेनंतर मोठा स्फोट झाला आणि बसमधून जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या रक्ताचा रस्त्यावर सडा पडला होता. दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी याच दिवशी देशाच्या सुरक्षा दलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आणि बरेच जण गंभीर जखमी झाले.
 
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देखील यात महत्त्वाची भूमिका बजावली. हा हल्ला करणारे आदिल, कारी यासीर, सज्जाद भट्ट, उमर फारूक, मुद्सीर अहमद खान आदी सर्वांना यमसदनी पाठवण्यात आलेले आहे. एनआयएने ऑगस्ट 2020 मध्ये पुलवामा हल्ल्याबद्दल तेरा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यात 19 आरोपींची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. त्यापैकी 6 मृत्युमुखी पडले आहेत. वेगवेगळ्या कारवाईत हे 6 दहशतवादी ठार झाले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख