चिनी सरकारवरील टीकेनंतर जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता!

जॅक मा यांनी चीन सरकारच्या धोरणावर टीका केली होती.
jack ma .jpg
jack ma .jpg

बीजिंग : चीनमधील सर्वात मोठी ऑनलाईन कंपनी असणाऱ्या अलिबाबा उद्योग समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी चीन सरकारच्या धोरणावर टीका केली होती. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. या टिकेनंतर त्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जगभरामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

जॅक मा यांच्या अॅण्ट समुहासंर्भात( एएनटी ग्रुप) ऑक्टोबर महिन्यापासून एक नवीन वाद सुरु झाला होता. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर रोजी  चीनमधील शांघाय शहरामध्ये भाषण करताना त्यांनी देशामध्ये संशोधनाला वाव मिळत नाही, असे मत व्यक्त केले होते. त्याचबरोबर जागतिक बॅंकींगसंदर्भात बोलताना चीन अजूनही जुन्या लोकांचा क्लब असल्यासारखे वाटते असे ते म्हणाले होते. आपण आपली सध्याची आर्थिक व्यवस्था बदलण्याची आवश्यकता असल्याचे, सांगत त्यांनी चीन सरकारच्या धोरणावर टीका केली होती.  त्यांनी शेवटचे टि्वट 10 ऑक्टोबर 2019 रोजी केले होते. 

या कार्यक्रमानंतर जॅक मा दिसलेच नाहीत. तर, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अलीबाबा कंपनीचे संस्थापक असणाऱ्या जॅक मा यांचा फोटोही कंपनीच्या संकेतस्थळावरुन काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

अलिबाबा कंपनीच्या आफ्रिकाज् बिझनेस हिरोज या कार्यक्रमांसाठी ते प्रमुख मार्गदर्शक असतानाही उपस्थित नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या जागी अलिबाबा कंपनीच्या अन्य एका अधिकाऱ्याने उपस्थिती लावली होती. जॅक मा हे कार्यक्रमाला उपस्थित का राहू शकले नाही, या प्रश्नावर त्यांच्या प्रवक्त्यांनी सारवासारव केली होती.  

जॅक मा यांच्या या वक्तव्यानंतर एएनटीच्या आयपीओला चीन सरकारने यंत्रणांनी दिलेली परवानगी नाकारण्यात आली. या आयपीओचे मूल्य सुमारे 37 बिलियन अमेरिकन डाॅलर इतकी होती. जगातील सर्वात मोठ्य रकमेचा हा आयपीओ होता. शांघाय स्काॅक एक्सचेंजने एएनटी समुहासंदर्भात काही तक्रारी समोर आल्याचे सांगत ऐनवेळी तो रद्द करण्यास भाग पाडले होते. 

जॅक मा यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी अमेरिका, युरोप आणि जागतिक आरोग्य संघटनेला कोट्यावधी मास्क मदत म्हणून पाठवले होते. जॅक मा हे त्यांच्या समाजसेवेसाठीही अोळखले जातात. जॅक मा फाऊण्डेशन हे शिक्षण, व्यवसाय, महिला नेतृत्व आणि पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करते. फोर्ब्सच्या अहवालानुसार 300 मिलियन अमेरिकन डाॅलर्सहून अधिक मदत करण्याचे उद्दीष्ठ जॅक मा यांच्या सेवाभावी संस्थेने ठेवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com