ट्रम्प यांच्या विरोधात 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षांची निवडणूक पुन्हा लढणार : बायडन - international new biden will compete with trump again in 2024 | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रम्प यांच्या विरोधात 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षांची निवडणूक पुन्हा लढणार : बायडन

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे 2024 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे 2024 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत तसेच उपराष्ट्राध्यक्ष कमला हँरिस यांच्या कामाचेही त्यांनी कैातुक केलं आहे, 'कमला हँरिस या पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक लढवू शकतात,' असेही बायडन यांनी सांगितले. व्हाईट हाऊस येथील 'ईस्ट रूम'मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जो बायडन बोलत होते. 

जो बायटन यांच्या या विधानामुळे त्यांची पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा असल्याचे दिसते. अमेरिकेतील 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केलेले नाही, म्हणून बायडन यांची लढत ट्रम्प यांच्याशी होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बायडन पहिल्यांदाच एकटेच पत्रकार परिषदेत आले होते. पत्रकारांशी बोलताना जो बायडन म्हणाले की, दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची माझी इच्छा आहे. माझा नशिबावर खूप विश्वास आहे. आमच्या सरकारचा कार्यकाल अजून साडेतीन वर्ष आहे. उपराष्ट्राध्यक्षा कमला हँरिस या उत्तर काम करणाऱ्या माझ्या सहकारी आहेत.

78 वर्षीय बायडन हे अमेरिकेचे सर्वात जास्त वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. 2024 मध्ये ते पुन्हा निवडणूक लढवतील तेव्हा त्यांचे वय 82 वर्ष असेल. न्‍यूयॉर्कमधील एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बायटन यांचा वार्षिक पगार जवळपास चार लाख अमेरिकन डॉलर इतका आहे. जर भारतीय चलनात याचं मुल्य सांगायच झालं तर, जवळपास 2 कोटी 92 लाख रुपये. याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून 50 हजार डॉलर्सचा वार्षिक भत्ताही मिळतो. तसेच एक लाख डॉलर्सचा नॉन टॅक्सेबल प्रवासी भत्ताही दिला जातो. अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मनोरंजनासाठी वार्षिक 19 हजार डॉलर्स देण्यात येतात. जर एखाद्या राष्ट्रपतींना आपला पगार दान करायची इच्छा असेल तर तो देखील दान करता येतो. राष्ट्रपतींची पत्नी म्हणजेच, अमेरिकेची फर्स्ट लेडीला कोणताच पगार दिला जात नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख