तटरक्षक दलानं कट उधळला...तीन हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

अरबी समुद्रामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी करणारी एक संशयित मच्छीमार नौका असल्याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली होती.
Indian coast guard sized Ak 47 rifles thousand live rounds and narcotics
Indian coast guard sized Ak 47 rifles thousand live rounds and narcotics

मुंबई : भारतीय तटरक्षक दलानं अरबी समुद्रात मोठा कट उधळून लावला आहे. तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईत एका श्रीलंकन मच्छीमार नौकेतून तब्बल 3 हजार कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, पाच एके 47 रायफल आणि एक हजार जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. या बोटीवरील 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

अरबी समुद्रामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी करणारी एक संशयित मच्छीमार नौका असल्याची माहिती तटरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर तटरक्षक दलाने तातडीने याबाबत शहानिशा करण्यासाठी मोहिम हाती घेतली. त्यासाठी तटरक्षक दलाची नौका आणि विमानाद्वारे लक्षद्वीप परिसरात टेहळणी सुरू करण्यात आली. ता. 18 मार्च रोजी या परिसरात गस्त घालत असताना मिनीकॉय येथे तीन संशयित नौका आढळून आल्या. 

तटरक्षक दलाच्या जवानांनी या नौका ताब्यात घेत तपासणी सुरू केली. त्यावेळी रवीहंसी या श्रीलंकन नौकेवर 300 किलो हेरॉईन, पाच एके 47 रायफल आणि 1 हजार जिवंत काडतुसे सापडली. आंतरराष्ट्रीय बाजारात या पोटेवर सापडलेल्या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 3 हजार कोटी एवढी आहे. उर्वरित दोन नौका या बोटेच्या संरक्षणासाठी वापरल्या जात होत्या. तिनही बोट व त्यावरील 19 जण ताब्यात घेण्यात आले आहेत. 

तटरक्षक दलाने पश्चिम किनारपट्टीवर अंमली पदार्थ विरोधी राबविलेली ही दुसरी मोठी मोहिम ठरली आहे. ता. 5 माचर् रोजी लक्षद्वीप परिसरात अक्षरा दुवा ही श्रीलंकन नौका पकडण्यात आली होती. त्यावर 260 किलो अंमली पदार्थ सापडले. या नौकेवरील सहा जणांनाही ताब्यात घेण्यात आले होते. मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्यातही अशीच मोहिम राबविण्यात आली होती. कन्याकुमारी जवळ एका श्रीलंकन नौकेवर सुमारे 1 हजार कोटी रुपये किंमतीचे 120 किलो अंमली पदार्थ व पाच हत्यारे जप्त करण्यात आली होती. 

अंमली पदार्थ तस्करी रोखण्यात मोठं यश

तटरक्षक दलाला मागील वर्षभरात समुद्रामार्गे होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात मोठं यश मिळालं आहे. वर्षभरात तब्बल 1.6 टनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 4 हजार 900 कोटी एवढी आहे. तर आतापर्यंत तब्बल 10 हजार 952 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त कऱण्यात आले आहेत. विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे राष्ट्रविरोधी कट उधळण्यात यश मिळत असल्याचे तटरक्षक दलाने म्हटले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com