भारत-चीन सैन्यात पुन्हा झटापट.. २० चिनी सैनिक जखमी

दोन्ही देशांच्या सैनिकांची झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेत २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत.
IC25.jpg
IC25.jpg

सिक्कीम : भारत आणि चीनमधील तणाव सातत्याने वाढत आहे. यापूर्वी पूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केले होते. आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांची झटापट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेत २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत.

उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत. तर भारताचे चार सैनिक जखमी झाले आहेत. तीन दिवासापूर्वी गस्त घालणाऱ्या चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मागच्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, भारतीय सैनिकांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु सैन्याकडून या वृत्ताबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात परंतु तणावाची असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच मे 2020 पासून पूर्व लडाखजवळच्या 826 किलोमीटर लांबीच्या लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल म्हणजेच एलएसीवर चिनी सैन्याने कोरोना महामारीदरम्यान अनेक ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. जूनमध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 सैनिकांना वीरमरण आलं होतं. तर यामध्ये चीनच्या बऱ्याच सैनिकांचा मृत्यू झाला होता.

कालच (ता. 24) भारत आणि चीनमध्ये कोअर कमांडर यांच्यात 17 तासांची मॅरेथॉन बैठक झाली होती. चीनच्या बीएमपी हट मोल्डोमध्ये झालेल्या या बैठकी नेमका काय तोडगा निघाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सीमेवरील तणाव कमी करावा आणि सैनिक मागे घेण्यासंदर्भात ही बैठक होती. सकाळी साडेनऊ वाजता सुरु झालेली ही बैठक रात्री अडीच वाजता संपली. चीननेच ही बैठक बोलावली होती. भारतीय सैन्याकडून लेहमधील चौदाव्या कोअर कमांडरचे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी चर्चा केली. आतापर्यंत भारत-चीनमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत, परंतु त्यात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील अधिकारी भेटून चर्चा करत आहे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com