कोरोनाचे केवळ पाचशे रुग्ण असलेला भारत सहा महिन्यात आज जगात दुसरा !  - India with only 500 corona patients is second in the world in six months! | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचे केवळ पाचशे रुग्ण असलेला भारत सहा महिन्यात आज जगात दुसरा ! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

एकीकडे सरकारने कोरोनाच्या चाचण्यांना वेग तर दिलाच पण त्याचबरोबर लस निर्मितीवर देखील देशातील अग्रणी संशोधन संस्था युद्धपातळीवर काम करत आहेत.

नवी दिल्ली, ः कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली त्याला आज सहा महिने पूर्ण झाली. सुरवातीला देशामध्ये कोरोनाचे केवळ पाचशे रुग्ण होते आता ही संख्या लाखांच्या घरांत पोचली आहे. 

एकीकडे सरकारने कोरोनाच्या चाचण्यांना वेग तर दिलाच पण त्याचबरोबर लस निर्मितीवर देखील देशातील अग्रणी संशोधन संस्था युद्धपातळीवर काम करत आहेत. कोरोनाविरोधात सर्वच आघाड्यांवर युद्ध छेडण्यात आले असले तरीसुद्धा हा संसर्ग नेमका कधी संपेल याबाबत संशोधकांमध्ये साशंकता दिसत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च रोजी दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती, हे करताना केवळ या माध्यमातूनच आपण कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडू शकतो असा दावाही मोदींनी केला होता. ज्यावेळी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हा देशामध्ये कोरोना बाधितांची संख्या पाचशे आणि बळींची संख्याही केवळ बारा एवढी होती. आता सहा महिन्यानंतर कोरोनाने देशाचे चित्रच बदलून टाकले आहे. आता कोरोना बाधितांच्या बाबतीत भारत हा जगात दुसऱ्यास्थानी पोचला आहे. 

आज बाधितांच्याबाबतीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. भारतातील कोरोनाबाधितांनी लाखांचा टप्पा केव्हाच ओलांडला असून मरण पावलेल्यांची संख्याही हजार वर पोचली आहे. सध्या देशामध्ये दररो कोरोनाच्या हजार एवढ्या चाचण्या घेतल्या जात असल्याचे आरोग्य मंत्रायलयाचे म्हणणे आहे.

सध्या कोरोनाच्या निदानासाठी आरटी-पीसीआर या चाचण्यांप्रमाणेच ढोबळमानाने अंदाज वर्तविणाऱ्या अँटीजेन चाचण्यांचाही आधार घेतला जात आहे पण त्याचाही कोरोनावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. लोक काळजी पुरेशी काळजी घेत नसल्याने हा संसर्ग कमी वेगाने पसरत असेल तर तो निश्‍चितपणे नियंत्रणात नाही असेच आपल्याला म्हणावे लागेल असे अर्थविश्‍लेषक आणि साथरोगतज्ञ रामानन लक्ष्मीनारायणन यांनी म्हटले आहे. 

कोरोना एकीकडे जगभर वेगाने पाय पसरत असताना मुख्य संसर्गामध्येही छुपा संसर्ग आहे, ग्रामीण भागासह देशात सर्वत्र कोरोना पसरतो आहे. जिथे मुळात चाचण्याच कमी आहेत तेथील बाधितांची खरी संख्या देखील समोर येताना दिसत नाही. भविष्यामध्ये आपल्याल यूपी आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये बाधितांची संख्या वाढलेली दिसेल पण त्यासाठी आरटी-पीसीआर टेस्टिंगचा आधार घ्यावा लागेल. 

कोरोनाचे संकट त्यानंतरचे लॉकडाऊन यामुळे देशातील उद्योग व्यवसायही ठप्प आहे. लाखो लोक बेराजगार झाले आहे. नोकऱ्या गेल्या आहेत. सहा महिन्यात जवळजवळल राज्यांची आर्थिक स्थितीही बिघडलेली दिसून येत आहे. आज कोरोनाचे रुग्ण कमी न होता ते वाढत असल्याचेच दिसून येत आहे. 
 

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख