भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे पाकिस्तानकडे - India behind Pakistan in nuclear warheads says SIPRI Report | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे पाकिस्तानकडे

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (एसआयपीआरपी- सिपरी) या संस्थेने आकडेवारी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : विकासाच्या बाबतीत भारताच्या कित्येक पटीने पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानने अण्वस्त्रांमध्ये मात्र भारताला पिछाडीवर टाकले आहे. पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक आण्विक शस्त्र असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. एवढेच नाही तर शेजारील चीनकडेही भारतापेक्षा जवळपास दुप्पट आण्विक शस्त्र असल्याचे या अहवालात म्हटले आहे. (India behind Pakistan in nuclear warheads says SIPRI Report)

‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ (एसआयपीआरपी- सिपरी) या संस्थेने सोमवारी जगभरातील आण्विक शस्त्रांची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी जानेवारी महिन्यापर्यंतची आहे. त्यानुसार चीनकडे 350, पाकिस्तानकडे 165 तर भारताकडे 156 आण्विक शस्त्र आहेत. जगातील नऊ देश अण्वस्त्र सज्ज असून त्यांच्याकडे सुमारे 13 हजार 80 आण्विक शस्त्र आहेत.

हेही वाचा : राम मंदिर जमीन गैरव्यवहाराने दिल्लीश्वरांच्या पायाखालची वाळू सरकली

जगात रशिया आणि अमेरिकेकडून एकूण आण्विक शस्त्रांपैकी 90 टक्के एवढा प्रचंड साठा असल्याचे अहवाला नमूद करण्यात आलं आहे. रशियाकडे सर्वाधिक 6 हजार 255 अण्वस्त्र आहेत. अमेरिका दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्याकडे 5 हजार 550 शस्त्रास्त्रे आहेत.  त्याचप्रमाणे ब्रिटन, फ्रान्स, इस्राईल आणि उत्तर कोरिया हे देशही आण्‍विक शस्त्रांनी सज्ज असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. फ्रान्सकडे 290, ब्रिटनकडे 225, इस्राईल 90 तर उत्तर कोरियात ४० ते ५० आण्विक शस्त्र आहेत. मात्र, ही आकडेवारी अचूक असल्याचा दावा 'सिपरी'च्या अहवालात करण्यात आलेला नाही. 

अण्वस्त्र सज्जतेत पडतेय भर

जगातील काही देश आण्विक शस्त्र तयार करत असून ती तैनातही केली जात आहेत. रशिया आणि अमेरिका वगळता अन्य काही देशांकडून अण्वस्त्र सज्जता वाढविण्यावर भर दिला जात आहे. चीनकडून त्यामध्ये वेगाने वाढ केली जात आहे. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तानकडूनही अण्वस्त्र कार्यक्रमावर भर देण्यात येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2016 ते 2020 या कालावधीत अण्वस्त्र आयात केलेल्या पाच मोठ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख