गेहलोत यांच्या निकटवर्तींच्या घरांवर आयकर विभागाचे छापे...

काँग्रेसमध्ये उलथापालथ होत असताना हे दुसरे संकट गेहलोत सरकारवर आले आहे. आय़कर विभागाने राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांच्या 22 ठिकाणी छापे टाकले.
3Ashok.jpg
3Ashok.jpg

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नातेवाईकांच्या घरावर आज आय़कर विभागाने छापे टाकले आहेत. एकीकडे राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये उलथापालथ होत असताना हे दुसरे संकट गेहलोत सरकारवर आले आहे. आय़कर विभागाने राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांच्या 22 ठिकाणी छापे टाकले. राजस्थान काँग्रेसमधील राजीव अरोडा आणि धमेंद्र राठैाड या दोन मोठ्या नेत्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाचे 200 हून अधिक अधिकारी चैाकशी करीत आहेत.

राजीव अरोडा आणि धमेंद्र राठैाड हे दोन्ही नेते अशोक गेहलोत यांच्या खूप जवळचे नेते आहेत. राजीव अरोड़ा हे गेहलोत यांचे आर्थिक व्यवस्थापक मानले जाते. तर  धमेंद्र राठैाड हे त्यांच्या निकटवर्तीय आहेत. 
राजीव अरोडा यांचा सराफी व्यवसाय आहे. तर अशोक गेहलोत यांचे चिंरजीव वैभव गेहलोत यांच्या लोकसभा निवडणुकीत राठैाड यांची महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.  

 
राजस्थानमधील राजकीय संघर्ष आता टोकाच्या पातळीवर गेला असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरु असून त्याला सुमारे नव्वद आमदार उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीला खुद्द सचीन पायलट आपल्या समर्थक आमदारांसह अनुपस्थित आहेत. पायलट हे काही आमदारांसह दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलविली होती. ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. कारण ते दिल्लीला गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक मुद्दावर आपले मत मांडले पण सचिन पायलट यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत अनेक प्रश्न निर्माण केले. काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे हे दोन दिवसांपासून पायलट यांच्याशी संपर्क साधत असतानाही त्यांच्यापर्यंत पोचू शकलेले नाहीत. खुद्द पांडे यांनीच याची कबुली दिली आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. मागील दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसलेल्या पायलट यांनी आता ३० काँग्रेस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सचीन पायलट काय भूमीका घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सचीन पायलट हे आता भाजपमध्ये असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस व छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया यांनी केले होते. मात्र, नंतर त्यांनी आपल्याला ज्योतिरादित्य शिंदे म्हणायचे होते, पण चुकीने पायलट यांचे नाव घेतले असा खुलासा त्यांनी केला.

Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com