आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या भवितव्याबाबतचा आज निकाल  - Important results today regarding Advani, Murli Manohar Joshi, Uma Bharti   | Politics Marathi News - Sarkarnama

आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या भवितव्याबाबतचा आज निकाल 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह यांचे भवितव्याबाबतचा महत्वाचा निर्णय आज होणार आहे.  

नवी दिल्ली : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज लखनऊ येथे सीबीआयचे स्पेशल कोर्ट निकाल देणार आहे. काही वेळातच निकालाचे वाचन सुरू होणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह यांचे भवितव्याबाबतचा महत्वाचा निर्णय आज होणार आहे.  

न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यातील काही आरोपी न्यायालयात उपस्थित आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांचे वय 75 वर्षांहून अधिक आहे, त्या आरोपींना निकालावेळी प्रत्यक्ष हजर राहू नये अशी सवलत न्यायलयाने दिली आहे. यामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.

1992 मध्ये बाबरी मशिद पाडली होती. त्यानंतर  28 वर्षांनी हा निकाल लागणार आहे. प्रकरण निकालात काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली ही अंतिम तारीख आहे. इतका काळ प्रलंबित असेलल्या या प्रकरणाच्या सुनावणीला तेव्हा वेग आला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शेवटची तारीख निश्चित केली. 

एप्रिल 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षांच्या आत निकाल देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तीनवेळा अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली होती. शेवटी 30 सप्टेंबर 2020 ला निकाल देण्यात यावा, असे आदेश देण्यात आले. या प्रकऱणातील गेल्या 18 वर्षात 17 आरोपींचा मृत्यू झाला आहे. 32 जणांविरोधात न्यायालयात निर्णय होणार आहे. 

बाबरी प्रकरणाची ट्रायल करणारे विशेष न्यायाधीश एस के यादव गेल्या वर्षी 30 सप्टेंबरला निवृत्त होणार होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवृत्ती रोखली होती. बाबरी मशिद प्रकरणाचा निकाल येईपर्यंत कार्यकाळ वाढवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने नोटिफिकेशन जारी केलं आणि कार्यकाळ निकाल जाहीर होईपर्यंत वाढवण्याचा निर्णय दिला. ट्रायलच्या कालावधीत न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिले होते.

हे  आहेत आरोपी

लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साघ्वी ऋतंभरा, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादूर सिंह, संतोष दूबे, गांधी यादव, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, आचार्य धमेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर  

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख