अवैध खाणींना शिवराज सिंह चैहानांचा वरदहस्त... - Illegal mining continues in MP as entire family of CM Chouhan is engaged in it, alleges Digivijaya Singh | Politics Marathi News - Sarkarnama

अवैध खाणींना शिवराज सिंह चैहानांचा वरदहस्त...

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 मार्च 2021

अवैध खाणींना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा वरदहस्त असून चौहान यांचे संपूर्ण कुटुंबच या अवैध धंद्यात कार्यरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गुरूवारी केला. 

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध खाणींना पेव फुटले असून वाळू उपश्यासारखे बेकायदेशीर धंदे येथे खुलेआम सुरू आहेत. कुणाच्यातरी वरदहस्ताशिवाय या मोठ्या गोष्टी सुरू असणे अशक्यच आहे. अवैध खाणींना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जबाबदार असून चौहान यांचे संपूर्ण कुटुंबच या अवैध धंद्यात कार्यरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गुरूवारी केला. 

दिग्विजय सिंह म्हणाले, शिवराज सिंह चौहान यांच्या आशिर्वादामुळे अवैध खाणींचे प्रमाण वाढतच असून थांबण्याचे नाव घेत नाही. याचा तपास होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. मध्य प्रदेश सरकारच्या कोरोनाकाळातील कार्यपद्धतीवर आगपाखड व्यक्त करताना दिग्विजय म्हणाले, भाजपच्या बैठकांमध्ये कोरोनाचा शिरकाव होत नाही. मात्र सार्वजानिक ठिकाणी मात्र कोरोना वेगाने पसरतो, हे अजबच म्हणावे लागेल. 

अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकप्रकरणी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, मी अगदी सुरूवातीपासूनच सांगत होतो की भाजप या साऱ्या प्रकाराला वेगळा रंग देईल. तुम्हाला हव्या असतील तर माझ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर सापडतील. भाजपकडून केवळ राजकारणच केले जात असून सत्य सर्वांसमोर लवकरच येईल. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून भाजपने उगाचच राजकरण करण्यात वेळ वाया घालवू नये, असा टोलाही चौहान यांनी लगावला.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख