भाजपच्या नेत्याची जीभ घसरली.. "मला कोरोना झाला तर मी ममता बॅनजींना मिठी मारेन..."

भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नेमणुक झाल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी त्यांनी हे वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे.
collage (4).jpg
collage (4).jpg

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे ते अडचणीत सापडले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नेमणुक झाल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी त्यांनी हे वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. 

रविवारी दुपारी पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील बरईपूर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी अनुपम हाजरा यांची जीभ घसरली. ते म्हणाले, “मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन” कारण कोरोना संकटात त्यांनी कोरोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही” 

या मेळाव्यात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मास्क घातले नव्हते, सामाजिक अंतर पाऴले नव्हते. याबाबत हाजरा यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की आमचे कार्यकर्ता अनेक मोठ्या संकटांना सामोरे जात आहे. ते ममता बनर्जी यांच्याशी लढत आहे. कारण त्या कोरोनाला घाबरत नाही. त्यांना कोणाचीही भीती नाही. 
 
तृणमूल काँग्रेसने हाजरा यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी हाजरा हे मनोरूग्ण असल्याची टीका केली आहे. टीएमसीचे प्रवक्ता कुणाल घोष म्हणाले की अशा प्रकारे व्यक्तव्य करणारा व्यक्ती हा अपरिपक्व किंवा वेडा असतो. हाजरा यांच्या या विधानामुळे ते कसे आहेत, याची कल्पना सर्वसामान्य व्यक्तींना येईल. हाजरा यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. ते भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले की  “तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक थप्पड मारली तर तुम्ही त्यांना चार थप्पड मारा, पण कुणत्याही परिस्थितीत बूथ लूटू देऊ नका.”  

हेही वाचा :  #Bihar Election ; सर्व 243 जागा लढण्याची काँग्रेसची तयारी... 

पटना  : निवडणुक आयोगानं बिहार निवडणुकीचं रणशिंग नुकतेच फुंकले आहे. सध्या बिहारमधील राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. काँग्रेसने बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व 243 जागा लढविण्याचे ठरविले आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीत सामील झालेल्या काँग्रेसला आघाडीत जर सन्मानजनक जागा मिळणार असतील , तर ते त्यांच्यासोबत निवडणुक लढविणार असल्याची माहिती काँग्रेस कार्यकारणीनी समितीचे प्रमुख अविनाश पांडेय यांनी दिली आहे. पांडेय म्हणाले की राष्ट्रीय जनता दलासोबत आमची सन्मानपुरक युती झाली तर आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढविणार आहोत. बिहार निवडणुकीत भाजपच्या विरोधात असलेले सर्व पक्ष काँग्रेससोबत आहेत. बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते अविनाथ पांडेय, सदस्य काजी निजामुद्दीन आणि देवेंद्र यादव हे पटना येथे पोहचले आहे. दोन दिवसाच्या बिहार यात्रेपूर्वी समिती सदस्यांची बैठक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष समीर कुमार सिंह श्याम सुंदर धीरज, आमदार डॅा. अशोक कुमार कैाकब कादरी, कॅाग्रेसचे विधानसभेचे नेते सदानंद सिंह, निवडणुक अभियान समितीचे अध्यक्ष राज्यसभा खासदार डॅा. अखिलेश प्रसाद सिंह यांच्यासोबत झाली आहे.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com