गेहलोत माझे वरिष्ठ आहेत, मी त्यांचा आदर करतो पण, त्यांनी मला "निक्कमा' म्हणायला नको होते : पायलट

पायलट हे पुन्हा पक्षामध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ज्या गेहलोतांविरोधात त्यांनी बंड केले होते ते आता शमले आहे.
 गेहलोत माझे वरिष्ठ आहेत, मी त्यांचा आदर करतो पण, त्यांनी मला "निक्कमा' म्हणायला नको होते : पायलट

जयपूर : अशोक गेहलोत यांनी माझा उल्लेख "निकम्मा' असा केल्याने मी प्रचंड दुखावला होता. अशाप्रकारची टीका करण्यापासून मी नेहमीच स्वत:ला रोखतो असे कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी म्हटले आहे. 

पायलट हे पुन्हा पक्षामध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ज्या गेहलोतांविरोधात त्यांनी बंड केले होते ते आता शमले आहे. त्यामुळे राजस्थानातील कॉंग्रेस सरकारचा धोकाही टळला आहे. दुसरीकडे गेहलोत आणि पायलट यांचे पुढेही जमणार नाही असे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी म्हटले आहे.

पायलट यांनी आज एक ट्‌विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, की मी नेहमीच कॉंग्रेसचा घटक राहिलो आहे. त्यामुळे माझा पक्षा कमबॅक नाही. राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या कारभाराविषयी माझ्या ज्या काही तक्रारी होत्या त्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या कानावर घातल्या आहेत. 

अशोक गेहलोत यांनी निकम्मा शब्द माझ्याविरोधात वापरल तेव्हा आपण खूपच व्यथित झालो होतो.कोणाचा कितीही विरोध केला तरी अशापद्धतीची भाषा मी कधीही वापरली नाही आणि वापरणारही नाही. माझ्या कुटुंबाकडून तशी शिकवणच मला मिळाली आहे.

गेहलोत हे माझे सिनियर आहेत यापूर्वीही आम्ही एकत्र काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आणि नसणार. माझ्यावर लोकांचे किती प्रेम आहे हे मला चांगले माहित आहे. 

मध्यंतरी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनीही पायलट यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करीत कठोर शब्दात समाचार घेतला होता. या दोघांना आयचे मतदारसंघ मिळाले त्यांनी कधी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या का ?

कधी सतरंज्या उचलल्या का असा सवालही केला होता. एकंदरच त्यांनी पक्ष सोडण्यावर तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच केंद्रातील सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी पायलट यांच्यावरही सडकून टीका केली आहे. 

पायलट यांना पुन्हा पक्षात आणण्याच्या प्रयत्नांना कॉंग्रेसला यश मिळाले आहे.आता ते कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. ते पक्षापेक्षा गेहलोत यांच्यावर प्रचंड नाराज होते. गेहलोतांना बाजूला करण्याची त्यांची एकमेव मागणी आहे. मात्र कॉंग्रेस त्यासाठी तयार नाही. बंडखोरीनंतर पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले होते. आता पायलट यांना पुन्हा ती पदे मिळतात की ते दिल्लीत राहुल गांधींबरोबर काम करतात का ? हे पाहावे लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com