अश्लील सीडीविषयी चार महिने आधीच माहिती होते; भाजप आमदाराचा धक्कादायक खुलासा

भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर अश्लील चित्रफितीवरून आरोप झाले आहेत.
I knew about the sex CD 4 months back says bjp mla
I knew about the sex CD 4 months back says bjp mla

बंगळूर : भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर अश्लील चित्रफितीवरून आरोप झाले आहेत. हे आरोप जारकीहोळी यांनी फेटाळून लावली आहे. ही चित्रफीत बनावट असून मला चार महिने आधीच त्याबाबत माहिती होते. तसेच ही चित्रफीत बाहेर येण्याच्या २४ तास आधीच मला समजले होते, असे जारकीहोळ यांनी म्हटले आहे. 

कर्नाटकमधील भाजप नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भाजपचे बी. एस. येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांवर जारकीहोळी यांचा हा व्हिडिओ दाखविला जात आहे. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

या घडामोडींनंतर माध्यमांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, माझ्याबद्दल हे षडयंत्र रचले आहे. मला सीडीबद्दल चार महिने आधीच माहिती होते. तसेच सीडी बाहेर येण्यापूर्वी २४ तास आधीच कळाले होते. ही सीडी बनावट आहे. हा कट २ ते ३ जणांनी रचला होता. मी याबाबत काहीही सांगणार नाही. ते तुरूंगात जाईपर्यंत त्यांना सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, संबंधित सीडी प्रकरणातील तरुणीचा पत्ता सापडला आहे. आयटी शहरातील एका बहुमजली इमारतीत एक मार्चपर्यंत राहणारी ही युवती, त्याच दिवसापासून बेपत्ता आहे. दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहळ्ळी यांनी अश्‍लील चित्रफीत प्रसिद्ध केली आणि पोलिस स्थानकांत तक्रार दिली. पीडित मुलगी आरटीनगरात राहत असल्याच्या माहितीच्या आधारे, पेइंग गेस्टनी इमारतीला भेट दिली आणि मुलीचा फोटो दाखवून तिची माहिती जमा केली. 

या माहितीवरून युवती याच इमारतीत राहात होती, याची खात्री झाली आहे. 'त्या' घराची तपासणी करून इमारत मालक आणि पर्यवेक्षकाची चौकशी करून पोलिस परतले. ती भाड्याने राहण्यास आली असताना दिलेला फोन नंबर व इतर तपशील घेऊन युवतीचा शोध घेण्यात येत आहे. उत्तर कर्नाटकातील रहिवासी असलेल्या पीडित युवतीने शहरातील महाविद्यालयात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. तथापि, अभ्यास पूर्ण झाला नाही. ती राजाजीनगरमध्ये एका कंपनीत काम करत होती, असे सांगण्यात आले.

ही युवती २०१८ पासून आरटीनगरात राहत होती. या इमारतीत ती राहात असताना तिचे मित्र तिच्याकडे वारंवार येत होते, असे घर मालकाने सांगितले. इमारतीचा मालक सरकारी कार्यालयात काम करत असल्याचे समजते.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com