कंगनाविषयी वेडवाकडं बोलणार नाही पण, तिच्यामुळे एक चित्रपट सोडला : सोनू सूद 

मला वाटते जे जे लोक बोलत होते. त्यांचे हात धरून त्यांना बिहार, उत्तराखंड घेऊन जायला हवे. तेथे लोकांना जेवायला पैसे नाहीत. बेराजगारी आहे. अशा लोकांसाठी काम न करता उगाच गप्पा मारता हे योग्य नाही.
कंगनाविषयी वेडवाकडं बोलणार नाही पण, तिच्यामुळे एक चित्रपट सोडला : सोनू सूद 

नवी दिल्ली : सुशांतसिंह जर का जिवंत असता आणि त्यांच्या नावाने सध्या जी सर्कस सुरू आहे ती पाहून तो हसला असता. जे लोक सुशांतला कधीही भेटले नव्हते ते लोकही त्याच्यावतीने बोलत आहेत याचे आपणास आश्‍चर्य वाटते असे अभिनेता सोनू सूद यांने म्हटले आहे. 

कोणत्याही वादात पडायचे नाही आणि आपण आपले काम करीत राहायचे. समाजासाठी जे काही करता येईत ते आपल्यापरिने करीत राहायचे यासाठी सोनू ओळखला जातो. लॉकडाऊनच्या काळात त्याने परप्रांतिय प्रवाशांना जी मदत केली होती त्यामुळे तो अधिकच प्रकाशझोतात आला होता. त्यावेळी त्याच्यावर शिवसेनेने टीका केली होती मात्र त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण करीत असलेल्या कामाची माहिती दिली होती. 

गरीबांना मदत हीच आपली भावना असल्याचे त्याने स्पष्ट केले होते आणि वादावर पांघरून घातले होते. आता त्याने अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरण आणि त्यानंतर उठलेले वादळ याबाबत भाष्य केले आहे. ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी त्यांना बोलते केले. त्यांने काही मुद्यावर भाष्य केले आहे. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील, त्याच्या बहीणी घरात होत्या. ते दु:खात होते मात्र बाहेरचे लोकच पुढे येऊन त्याच्यावर बोलत होते. मी किमान दहा वेळा तरी सुशांतला भेटलो असेन असे स्पष्ट करून सोनू म्हणाला, की बाहेरून मुंबईत आलेल्या सुशांतने खूप काही कमविले होते. मेहनतीने यश मिळविले होते. 

माझ्या मावस भावाचे पंजाबमध्ये अनेक मित्र आहेत. त्यांना मी विचारले की आपणास सुशांतबाबत काय माहिती आहे का ? त्यावर त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. तसेच बॉलीवूड आणि राजकारणाबाबतही झाले. अनेक अभिनेते, अभिनेत्री असतील किंवा दिग्दर्शक, निर्मातेच नव्हे तर अनेक पक्षाचे नेतेही सुशांतच्या आत्महत्येनंतर पुढे येऊन बोलू लागले. तसेच मीडियाबाबतही आहे.

मला वाटते जे जे लोक बोलत होते. त्यांचे हात धरून त्यांना बिहार, उत्तराखंड घेऊन जायला हवे. तेथे लोकांना जेवायला पैसे नाहीत. बेराजगारी आहे. अशा लोकांसाठी काम न करता उगाच गप्पा मारता हे योग्य नाही. हळूहळू असे लोक नवा झेंडा, नवा विषयी घेऊन पुढे येतील या मुद्यावर जेवढे कमी बोलेन तेवढच पुरे आहे असे मला वाटते. 

अभिनेत्री कंगना राणावत माझी मैत्रीण आहे. तिचे कुटुंब मला ओळखते. त्यामुळे तिच्याविषयी वेडेवाकडे मी बोलणार नाही. पण, एका चित्रपटावरून आमचे मतभेद झाले आणि मी हात जोडून तो सिनेमा सोडला होता. मला खूप दु:ख झाले होते कारण मी चार महिने त्या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती.

त्यावेळी तिने माझ्यावर एक आरोप केला होता की एका महिलेच्या हाताखाली त्यांना काम करायला कमी वाटते. त्यावर अधिक बोलण्यास त्यांने नकार दिला. मात्र तसे काही नव्हते इतर काही महिला दिग्दर्शकांबरोबर मी केल्याचा दावाही सोनू यांने यावेळी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com