कोरोनाग्रस्त पुजाऱ्यासाठी असुदुद्दीन ओवैसी पुढे सरसावले...AIMIMच्या रूग्णालयात दाखल - Hyderabad temple head priest receives help from aimim asaduddin owaisi in getting hospital bed | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाग्रस्त पुजाऱ्यासाठी असुदुद्दीन ओवैसी पुढे सरसावले...AIMIMच्या रूग्णालयात दाखल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

लाल दरवाजा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला एआईएमआईएमकडून चालविण्यात येत असलेल्या असरा रुग्णालयात दाखल केले. 

हैदराबाद : कोरोनाची दुसऱ्या लाटेने देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्ययंत्रणेवर ताण येत आहे. अनेक व्यक्ती, सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत.  

डॉक्टर, नर्सेस, शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणा कोरोना संकटाशी युद्धपातळीवर लढत असताना नाशिक किंवा विरारसारख्या दुर्घटना घडून रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. तर काही ठिकाणी बेडसाठी रुग्णांचे नातेवाईक धावपळ करीत आहे. अशीच एक घटना नुकतीच हैदराबाद येथे घडली. 

हैदराबाद येथील प्रसिद्ध लाल दरवाजा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात अडचणी येत होत्या. त्यांना दाखल करण्यास अनेक रूग्णालय प्रशासनाने नकार दिला होता, ही बाब एआईएमआईएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना समजली. त्यांनी लगेच त्यांना एआईएमआईएमकडून चालविण्यात येत असलेल्या असरा रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 
 
तेलंगनामध्ये काल ५ हजार ५६७ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३ लाख ७३ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात २३ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशातील सध्याची कोरोना स्थिती, कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, वाढता मृत्यूदर यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच कोरोना रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केल्यानंतर या बैठका आयोजित केल्या आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख