गृहमंत्र्यांनी स्टेजवरून आवाज देऊनही न आलेले तहसिलदार जागेवरच निलंबित

आपल्या कार्यक्रमाकडे स्थानिक तलाठी, तहसिलदाराने पाठ फिरविल्याचे लक्षात आल्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
Home Minister Narottam Mishra suspend Tehsildar for not attended program
Home Minister Narottam Mishra suspend Tehsildar for not attended program

भोपाळ : गृहमंत्र्यांनी तीनवेळा आवाज देऊनही तहसिलदार किंवा तलाठी न आल्याने त्यांनी थेट दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या कार्यक्रमाकडे स्थानिक तलाठी, तहसिलदाराने पाठ फिरविल्याचे लक्षात आल्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. गृहमंत्र्यांच्या या पवित्र्यामुळे इतर अधिकाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला होता.

गृहमंत्री मिश्रा हे एका कार्यक्रमासाठी मध्यप्रदेशातील दतिया जिल्ह्यातील बडोनी येथे गेले होते. प्रोटोकॉलनुसार त्यांच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, स्थानिक तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण या प्रोटोकॉलचा पुर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले. हा प्रशासकीय कार्यक्रम असूनही तिथे अधिकारी उपस्थित नव्हते. 

या कार्यक्रमामध्ये गृहमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रेशनिंग कार्ड दिले जाणार होते. पण कार्यक्रमाच्या आयोजनात प्रशासकीय समन्वय दिसून आला नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तहसीलदारांना तीनवेळा आवाज दिला. पण कोणीही फिरकले नाही. तलाठीही तिथे उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. जिल्हाधिकारीही उपस्थित नसल्याचे पाहून गृहमंत्री चांगलेच संतापले. जाहीर कार्यक्रम असूनही प्रोटोकॉल पाळला गेला नाही, हे पाहून त्यांनी बडौनीचे तहसिलदार सुनील वर्मा आणि तलाठ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. 

याबाबत मिश्रा यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. रेशनकार्ड वितरणामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल वर्मा यांना निलंबित केले आहे. वंचित व गरीब घटकांसाठीच्या सरकारच्या कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी नमुद केले आहे. 

कार्यक्रमाला उपस्थित अन्य कर्मचारी व अधिकाऱीही घाबरले होते. गृहमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरूनच हे आदेश काढल्याने जिल्ह्यात हा विषय चर्चेचा ठरला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com