प्रकृती बिघडल्याने अमित शहा पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल 

शहा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना शनिवारी रात्री पुन्हा ‘एम्स’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
44_378.jpg
44_378.jpg

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसापूर्वी कोरोनामुक्त झाल्याची माहिती टि्वटवरून दिली होती. शहा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना शनिवारी रात्री पुन्हा ‘एम्स’मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यांची प्रकुती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दीड महिन्यात अमित शहा यांनी तीन वेळा उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन आठवड्यात दुसऱ्यांदा शाह यांना ‘एम्स’मध्ये दाखल कऱण्यात आले आहे. 

अमित शहा यांची दोन महिन्यापूर्वी कोरोनाची चाचणी पॅाझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना गुरूग्रामा येथील मेदांता रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारानंतर त्यांना कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना रूग्णांलयातून घरी सोडण्यात आले होते. ‘एम्स’चे संचालक डॅा. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली डॅाक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहेत.  


हेही वाचा : कोरोनामुक्त झाल्याने भाजप आमदारावर फुलांची उधळण 
 
पंढरपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यांना काल येथील हॅास्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने विविध फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. पावसाळी अधिवेशन दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये ते पॅाझिटीव्ह आले होते. त्यानंतर ते पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. योग्य उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आमदार पडळकर कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी गुलांब फुलांचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन केले. तर  बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, धनगर आरक्षण समन्वय समितीचे सदस्य प्रा. सुभाष मस्के, संजय माने यांनी चक्क जेसीबीच्या सहाय्याने आमदार पडळकर यांच्यावर विविध फुलांनी उधळण करत घोषणा दिल्या. त्यांच्या स्वागतासाठी  झेंडू, आष्टर, गुलाब, गुलछडी, शेवती अशा  विविध  100 हून अधिक पोती फुलांचा वापर केला. रुग्णालयाच्या वतीनेही त्यांना पुष्पगु्च्छ देवून त्यांचा सत्कार कऱण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com