भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांची आत्महत्या

भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांनी आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली.
sharma17.jpg
sharma17.jpg

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा (वय 62) यांनी आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. खासदार रामस्वरूप शर्मा हे काही दिवसापासून आजारी होते.  

दिल्ली येथील आरएमएल रूग्णालयाजवळील निवासस्थानी शर्मा यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आज होणारी भाजपच्या संसदीय समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे रोज पहाटे सहा वाजता उठतात, पण आज साडेसहा वाजले तरी ते उठले नाही म्हणून त्यांच्या स्वीय सहायकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला असता शर्मा यांनी गळफास घेतल्याचे दिसले. 

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून ते दोन वेळा निवडणून आले होते. त्यांची प्रकृती अवस्थ असल्यामुळे ते काही दिवसांपासून तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले. ते कबड्डी खेळाडू होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते कार्यकर्ते होते. भाजप मंडी जिल्हा सचिव, भाजप हिमाचल प्रदेश सचिव आदी पदांवर त्यांनी काम केले होते. हिमाचल फूड एंड सिविल सप्लाई कॉरपोरेशनचे ते अध्यक्ष होते.    2014च्या निवडणूक काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा सिंह यांचा त्यांनी 40 हजार मतांनी पराभव केला होता. 

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये डेलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते. 

डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट लिहिली होती. तपासणीतही ते देलकर यांचेच हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेलकर यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचे हस्ताक्षर ओळखले आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीनेही पडताळणी करण्यात आली. त्यात सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्यांचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने डेलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यातही ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

हेही वाचा : माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोरोनाने निधन
 
नगर : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप मनसुखलाल गांधी (वय 70) यांचे आज (बुधवारी) पहाटे दिल्ली येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी हे त्यांचे ते वडील होत. गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. काल त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. मृत्यूसमयी त्यांच्यासमवेत पत्नी व दोन्ही मुले होती. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com