मोदींनी लस घेतली पण भाजपच्याच आरोग्य मंत्र्यांची नकारघंटा

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली आहे.
Health Minister Anil vij says dont want to take corona vaccine
Health Minister Anil vij says dont want to take corona vaccine

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लस घेत ज्येष्ठांना लस घेण्याचे आवाहन केले. पण भाजपच्या मंत्र्यांनी लस घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. आपल्यामध्ये पुरेशा अँटीबॉडी असल्याचा दावा या मंत्र्यांनी केला आहे. 

आजपासून देशातल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती व विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. आज है औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. स्वतः पंतप्रधानांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.  कोरोना जागतिक महामारीमध्ये आपल्या डाॅक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी जे काम केले ते उल्लेखनीय असल्याचं सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचं कौतुक केलं. जे आजपासू लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

भाजपचे हरियाणातील आरोग्यमंत्री अनिल विज यांनी लस घेणार नसल्याचे ट्विटवर जाहीर केले आहे. लस न घेण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. ते म्हणतात, ''सामान्य जनतेसाठी कोरोना लस मिळण्यास आज  सुरूवात होणार आहे. सर्वांनी लस टोचली पाहिजे. मी तर लस घेणार नाही. कारण कोरोना झाल्यानंतर माझ्यातील अँटीबॉडी 300 झाल्या असून त्या खूप जास्त आहेत. चाचणीमध्ये मी घेतलेल्या लसीमुळे हे झाले असावे. मला आता लसीची गरज नाही.'' 

दरम्यान, देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.  सोमवारपासून (१मार्च) ६० वर्षांवरील नागरिक आणि विविध आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालात ही लस मोफत तर खासगी रुग्णालयात सशुल्क देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने लशीची किंमत २५० रुपये निश्चित केली आहे.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास १६ जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे.

त्यानंतर ही लस ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील रुग्णांचा यात समावेश असेल. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी २५० रुपये मोजावे लागतील. यात १०० रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

अशी असेल नाव  नोंदणीची प्रक्रिया -
- को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी 
- प्रत्यक्ष कोरोना लसीकरण स्थळीही नोंदणीची सोय 
- 60 वर्षांवरील व्यक्तीला केवळ वयाचा पुरावा लागेल 
- 60 वर्षांवरील व्यक्तींना ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, वाहन चालण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट अथवा पॅन सादर करावे लागेल 
- 45 ते 60 वयोगटातील व्यक्तींचा आजारपणाचे प्रमाणपत्र आवश्यक 
- एका मोबाईल अॅपमधून चार जणांची नोंदणी शक्य 
- आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातूनही नोंदणी करता येईल 
- मोबाईल नसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना 2.5 लाख सुविधा केंद्रे 
- सुविधा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक करु शकतात नोंदणी 
- को-विन अॅपवरुन जवळचे लसीकरण केंद्रही शोधता येईल 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com