सरकारचा मोठा निर्णय : होम क्वारंटाइन असणाऱ्यांना 5000 रुपयांची मदत..

राज्यातील जनतेच्या उपचारासाठी सरकाने आपली तिजोरी उघडली आहे.
3Sarkarnama_20Banner_20_289_29_15.jpg
3Sarkarnama_20Banner_20_289_29_15.jpg

चंदिगड : कोरोनामुळे सर्वसामान्य गरीब जनतेचे खूप हाल होत आहे. उपचारासाठी पैसे नसल्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे, अशा परिस्थिती हरियाना Haryana सरकारनं जनतेला दिलासा दिला आहे. राज्यातील जनतेच्या उपचारासाठी सरकाने आपली तिजोरी उघडली आहे. हरियाणाने आरोग्यमंत्री अनिल वीज Anil Vij यांनी याबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.  haryana govt giving rs 5000 to home isolated corona infected bpl family

कोरोनावर उपचार घेत असलेले दारिद्ध रेषेखालील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या बॅकखात्यात थेट पाच हजार रुपये जमा होणार आहे.त्यामुळे पैशाअभावी उपचार घेऊ न शकणाऱ्यांना गरीब लोकांना त्यांचा लाभ मिळणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री अनिल वीज म्हणाले की, होम आयसोलेट बीपीएल श्रेणीच्या लोकांकडे सरकारच्या एकरकमी पाच हजार रुपयांच्या मदतीसाठी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. खासगी रुग्णालयांना अशा रुग्णांची माहिती https://gmdahrheal.in/ वर अपलोड करावी.  कोविड संबंधित मदतीसाठी 8558893911 हेल्प लाईन क्रमांकदेखील देण्यात आला आहे.  गुरुग्राम आणि फरिदाबादला सोडून कोविडच्या माहितीसाठी 1075 हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे.   

बीपीएल कार्डधारकास कोणत्याही रुग्णालयात सात दिवस उपचारासाठी केलेल्या बिलात 35,000 रुपयांची सूट, कोविड नोंदणीकृत रुग्णालयांना हरियाणाच्या लोकांना त्यांच्या उपचारासाठी येथे दाखल केले गेले तर जास्तीत जास्त सात दिवसांसाठी दररोज एक हजार रुपये, अशा रुग्णालयांना सात हजार रुपये मिळतील, असा निर्णय यापूर्वीच हरियाणा सरकारने घेतला आहे.  राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे 40 लाख कुटुंबांना उपचार देण्यासाठी आठ हजार गटांची स्थापना केली आहे.

हेही वाचा : मोदी सरकार लोकांचे खिसे कापत आहे...नवाब मलिकांचा घणाघात...लूट थांबवा...
मुंबई : "पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत आहे. हे पाकिटमार सरकार बनलेय," असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com