बॉलीवूडसाठी भाजपच्या दोन राज्यांतच चढाओढ सुरू

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती.
Haryana Government proposes to develop Pinjore and Gurugram as film cities
Haryana Government proposes to develop Pinjore and Gurugram as film cities

चंदीगड : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली होती. त्यावरून राज्यात चांगलेच राजकारण पेटले होते. आता भाजपच्या आणखी एका राज्याने फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपच्याच दोन राज्यांमध्ये फिल्म सिटीसाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. 

भारतीय चित्रपटाचा इतिहास जेथे रचला आणि तो समृद्ध सुरू झाला, ती मुंबई महानगरी. गायन, वादन, नृत्य, चित्रपट अशा कोणत्याही कलांत नाव कमवायचे असेल मुंबईशिवाय देशातील कोणत्याही कलाकाराला त्यावेळी पर्याय नव्हता. कलेच्या प्रांतात कोलकत्ता, लाहोर ही शहरे मुंबईच्या स्पर्धेत होती. पण ती कधीच मागे पडली आणि बॉलिवूड मुंबईचे आणि मुंबई बॉलिवूडची झाली. आजही या मायानगरीची भूरळ प्रत्येकाला आहे. 

पण योगी आदित्यनाथ यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत येऊन फिल्म सिटीची घोषणा केली. मुंबईची फिल्मसिटी आम्ही कुठेही नेणार नाही. मात्र, उत्तर प्रदेशात नवीन गरजांनुसार जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. योगींनी मुंबईत आल्यानंतर बॉलीवूडमधील अभिनेत्यांच्या, निर्मात्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे योगी हे बॉलीवूड उत्तर प्रदेशात नेणार, अशी चर्चा सुरू झाली.

आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनीही फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पपात भरघोस तरतुदही केली आहे. पिंजोर आणि गुरुग्राम याठिकाणी फिल्म सिटी विकसित केली जाणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले आहे.  हरियाणा सरकारने फिल्म सिटीसाठी ५० ते १०० एकर जमीन आरक्षित केल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच खट्टर यांनी काही बॉलीवूड कलाकारांची भेटही घेतली होती. 

मागील वर्षी अभिनेता सुशांत सिंह रजपुतने आत्महत्या केली. त्यानंतर डॅग्ज प्रकरणात एकापाठोपाठ एक प्रसिध्द कलाकारांची नावे पुढे आली. अभिनेत्री कंगना राणावतचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले. त्यावरूनही मोठा गदारोळ झाला. त्यामुळे काही कलाकारांनी उघडपणे थेट राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यातच उत्तर प्रदेशात फिल्म सिटीचा मुद्दा पुढे आल्याने वाद निर्माण झाला होता. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com