नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नववर्षानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी जनतेच्या सुख, समुद्धी आणि उत्तम आरोग्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी याबाबत टि्वट केलं आहे.
Wishing you a happy 2021!
May this year bring good health, joy and prosperity.
May the spirit of hope and wellness prevail.
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2021
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका गांधी आदींनी नवीन वर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टि्वट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात की व्यक्तीगत आणि सामुहीकपणे केलेल्या संकल्पांना बळ देण्याचा हा दिवस असतो. कोरोनाच्या संकटात सर्वांनी आव्हानांना सामोरे जाऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. माझी प्रार्थना आहे की आपण सर्व जण सुखी, आरोग्यसंपन्न राहा. देशाच्या विकासाला हातभार लावावा.
आइए, हम सब मिलकर प्रेम और करुणा की भावना से एक ऐसा समावेशी समाज बनाने की दिशा में काम करें जहां शांति और सद्भाव को बढ़ावा मिले।
मेरी कामना है कि आप सभी स्वस्थ एवं सुरक्षित रहें और नई ऊर्जा के साथ हमारे देश की प्रगति के साझा लक्ष्य को प्राप्त करने के लिए आगे बढ़ें।
— President of India (@rashtrapatibhvn) January 1, 2021
मुख्यमंत्र्यांनी लिहिले राज्यातील जनतेला खुले पत्र
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प नवीन वर्षात करुयात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे.नवीन वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, असे आवाहन करुन ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात लढलेला कोरोना लढ्याचा थोडक्यात आढावा घेतला असून नवीन वर्षात परिस्थिती कशी असेल याचाही थोडक्यात आढावा घेतला आहे.
या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात....गेल्या वर्षभरात संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहाभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने करोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी करोना काहीश्या प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं आहे.

