सर्वाधिक श्रमिक रेल्वे 'या' राज्याला.. 

गुजरातला सर्वाधिक 1026 गाड्या देण्यात आल्या. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असलेल्या महाराष्ट्रातून 802 गाड्या सुटल्या.
20Shramik_Special_trains
20Shramik_Special_trains

नवी दिल्ली :  देशात  24 मार्च रोजी रात्री आठ वाजता लावण्यात आलेल्या कोरोना लोकडाउनमुळे देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या आणि आपापल्या राज्यांमध्ये घरी परतू इच्छिणाऱ्या लाखो श्रमिक कष्टकऱ्यांना सोडण्यासाठी रेल्वेने 4231 श्रमिक स्पेशल विशेष रेल्वेगाड्या आतापर्यंत सोडल्या आहेत. गुजरातला सर्वाधिक 1026 गाड्या देण्यात आल्या. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असलेल्या महाराष्ट्रातून 802 गाड्या सुटल्या. 


रेल्वेकडून आज 'सकाळ'ला मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाउनच्या काळात संपूर्ण देशातून आतापर्यंत  4231 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत. यातील 4165 गाड्या त्या त्या राज्यांमध्ये पोहोतल्या आहेत. 69 गाड्या रस्त्यात आहेत. 
सर्व राज्यांमधून सोडलेल्या एकूण गाड्यांचा विचार केला तर उत्तर प्रदेश (1695) आणि बिहार (1519) या दोनच राज्यांसाठी जवळपास निम्म्या, म्हणजेच सर्वाधिक गाड्या सोडण्यात आल्या.

झारखंडसाठी 202, पश्चिम बंगालसाठी 190, ओडिषा 206, आसामसाठी 53 आणि मध्य  प्रदेशासाठी 128 श्रमिक स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून 802 पैकी आतापर्यंत उत्तर प्रदेशासाठी सर्वाधिक 423 तर बिहारसाठी त्याखालोखाल 193 रेल्वेगाड्या सुटल्या. त्यानंतर पश्चिम बंगालसाठी 45, झारखंड साठी 28 गाड्या सोडण्यात आल्या.

राज्यातून  सोडलेल्या श्रमिक स्पेशल गाड्या 

आंध्रप्रदेश 3, आसाम 7, बिहार 193 चंडीगड गुजरात इं हिमाचाल प्रदेश 2 , केरळ आणि कर्नाटक प्रत्येकी 2 मध्य प्रदेश 34, मणिपूर नागालँड 2 - 2 ओडीशा 16, त्रिपुरा 2 , तेलंगण 8, उत्तर प्रदेश 423 , उत्तराखंड 4, पश्चिम बंगाल 45.

हेही वाचा : बर्फातील शिवलिंग साकारले, यंदा 'ही' यात्रा होणार का ?
 
श्रीनगर  : दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ येथील गुहेत बर्फातील शिवलिंग साकारले आहे. त्याची छायाचित्र नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या छायाचित्रांमध्ये सगळीकडे बर्फ दिसत आहे. गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार झालेले दिसत आहे. येत्या २२ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे यंदा अमरनाथ यात्रा होणार की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही. यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा करण्याचा प्रस्ताव अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाने दिला आहे.

अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाने कोरोनामुळे यंदा यात्रा रद्द केल्याचे निवेदन २२ एप्रिल रोजी दिले होते. मात्र, नंतर ते मागे घेण्यात आले. त्याऐवजी यात्रेची मुदत १५ दिवस करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात्रा बालताल मार्गावरुन सुरु व्हावी, असेही या प्रस्तावात अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाने म्हटले आहे. यात्रेचा पारंपरिक मार्ग पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग, पंचतरणी असा आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com