"लोकमान्य टिळकांचा मंडालेत भव्य पुतळा उभारणार'  - "A grand statue of Lokmanya Tilak will be erected in Mandalay" | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

"लोकमान्य टिळकांचा मंडालेत भव्य पुतळा उभारणार' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

हा पुतळा उभारण्याचे काम याच वर्षभरात पूर्ण करण्याची भारत सरकारची योजना आहे. 

नवी दिल्ली ः लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त म्यानमारमधील मंडाले येथे त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. ब्रिटीशांच्या कैदेत असताना लोकमान्यांनी याच कारागृहात गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहीला होता. 

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे व विदेश सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी म्यानमारला दिलेल्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान मंडाले येथे लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्याच्या योजनेवर द्विपक्षीय चर्चा झाली. हा पुतळा उभारण्याचे काम याच वर्षभरात पूर्ण करण्याची भारत सरकारची योजना आहे. 

त्याचबरोबर 2016 मधील भूकंपात मोठे नुकसान झालेल्या बगान मंदिरसमूहाच्या जीर्णोध्दारासाठीही भारत सराकर म्यानमारला आर्थिक मदत देणार आहे. कोवीड-19 महामारीशी लढण्यासाठी भारताने म्यानमारला 3000 व्हिरल्सची आर्थिक मदत दिली आहे तीही रक्कम यावेळी त्या देशाकडे सुपूर्द करण्यात आली. 

या भेटीत सांस्कृतिक आदानप्रदानावरही चर्चा झाली. ब्राम्ही भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचा भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याची योजनाही दोन्ही देशांनी मान्य केली. जनरल नरवणे व श्रींगला यांनी म्यानमारच्या प्रमुख ऑन सान स्यू की व तेथील लष्करप्रमुख जनरल आँग हांल्ग यांच्याशीही चर्चा केली.

म्यानमारमधील सिट्टवे बंदर 2021 च्या पहिल्या तिमाहीत कार्यान्वित करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे. म्यानमार व मिझोरामला जोडणाऱ्या सीमावर्ती भागातील बॉर्डर हाट पुलाच्या पुनर्निमाणासाठी भारत म्यानमारला 2 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे सहाय्य करणार आहे. 

दरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता राखण्यासाठीच्या सहकार्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानुसार म्यानमारने पकडलेल्या 22 भारतीय बंडखोरांना भारताच्या ताब्यात दिले. केंद्र सरकारने नागालॅंडमधील एनएससीएन (खापलांग) या बंडखोर गटावरील बंदी , हिंसक व बेकायदेशीर कारवायांच्या कारणावरून 28 सप्टेंबरला वाढविली होती.

त्यानंतर काही दिवसांतच दोन्ही देशांदरम्यान सामरीक, व्यापार व सांस्कृतिक संबंध सुरळीत करण्याची पावले टाकण्यात आली हे उल्लेखनीय असल्याचे जाणकार मानतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख