सरकार अल्पमतात..बहुमत सिद्ध करा.. राज्यपालांचा आदेश... - governor of puducherry puducherry lg orders floor test in the legislative assembly on february-22 | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार अल्पमतात..बहुमत सिद्ध करा.. राज्यपालांचा आदेश...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

पुदुच्चरी येथील काँग्रेसचे सरकार चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर संकटात सापडले आहे.​ 

नवी दिल्ली : पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. सरकारला येत्या 22 तारखेला बहुमत सिद्ध करण्यास नायब राज्‍यपाल तामिलिसाई सौंदर्यराजन यांनी सांगितले आहे. पुदुच्चरी येथील काँग्रेसचे सरकार चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर संकटात सापडले आहे. सरकार अल्पमतात नसल्याचे मुख्यमंत्री नारायणसामी यांचे म्हणणे आहे.    

पुदुच्चेरी येथे पुढच्या काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ होण्यास सुरवात झाली आहे. पुदुच्चेरीत येथे काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण पेटू लागले आहे. गेल्या मंगळवारी किरण बेदी यांनी नायब राज्यपाल पदावरून हटविण्यात आले.  

पुदुच्चेरीत काँग्रेसचे सरकार आहे. मात्र, काँग्रेसचे आमदार ए जॉन कुमार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. कामराज नगरमधून पोटनिवडणुकीत २०१९ मध्ये ए जॉन कुमार हे निवडून आले होते. किरण बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदावरून हटवल्यानंतर पुदुच्चेरीची जबाबदारी तेलंगणच्या राज्यपालांकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तेलंगणचे राज्यपाल टी. सुंदरराजन हे पुदुच्चेरीचे नायब राज्यपालही असतील. राष्ट्रपती भवनकडून ही माहिती दिली गेली आहे.

किरण बेदी यांना पदावर हटविल्यानंतर त्यांचा पदभार स्वीकारणाऱ्या तामिलीसाई सौंदर्यराजन यांनी सांगितले की 30 सदस्य असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे 15 आमदार आहेत. डीएमके ते तीन आणि एक अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. पण काँग्रेसच्या चार आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सरकारमधील परिस्थिती बदल झाला आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा जमा करण्यास असमर्थ आहेत. 
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख