पाकिस्तान सरकार करणार भारताच्या दोन अभिनेत्यांच्या घराचं जतन.. 

राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर विकत घेण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतला आहे.
collage.jpg
collage.jpg

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकार ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर विकत घेण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतला आहे. अभिनेता राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर पेशावर येथे आहे. या घरांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांचे जतन करण्यासाठी या वास्तू पाकिस्तान सरकारनं विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

खैबर-पख्तूनख्वा येथील पुरातत्व वास्तू विभागाने ही दोन्ही घरे खरेदी करण्यासाठी योग्य रक्कम देण्याची ग्वाही दिली आहे. या दोन्ही वास्तूंना पाकिस्तानची राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. याबाबत पुरातत्व वास्तू विभागाचे प्रमुख डॅा. अब्दुस समद खान यांनी सांगितले की पेशावर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही वास्तूंचे मूल्य निश्चित करण्यासाठी सांगितले आहे. याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे घर पेशावर येथे आहे. या घरातच त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे बालपण या घरामध्ये गेलं आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर राज कपूर आणि दिलीप कुमार यांचा परिवार भारतात आला. त्यानंतर या घरांची खूप पडझड झाली आहे. या घराचे जतन करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 

पेशावर येथील राज कपूर यांच्या पूर्वजांचे हे घर "कपूर हवेली" म्हणून ओळखली जाते. ही कपूर हवेली ख्वानी बाजार परिसरात आहे. 1918 ते 1922 दरम्यान राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेश्र्वरनाथ कपूर यांनी ही "कपूर हवेली" बांधली होती. या हवेलीमध्ये राज कपूर आणि त्याचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला होता. येथील राज्य सरकारने कपूर हवेली राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केली आहे. दिलीप कुमार यांचं घरही याच परिसरात आहे. त्याच्या घराचीही दुरवस्था झाली आहे. दिलीप कुमार यांच्या या घराला 2014 मध्ये तत्कालीन नवाज शऱीफ सरकारने राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं होतं.

ही दोन्ही घरं शहराच्या मध्यवस्तीत प्राइम लोकेशनवर असल्याने या घरांचे मालक ही घरे पाडून या ठिकाणी व्यावसायिक इमारत बनविण्याचा अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. पण या घरांचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता त्याचं जतन होणं महत्वाचं आहे. त्यासाठी ही दोन्ही घर पाडण्याच्या प्रक्रीयेला पाकिस्तान प्रशासनाने थांबविले होतं. 
   
कपूर हवेलीचे मालक अली कदर यांनी सांगितले की ते कपूर हवेलीला पाडण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. या हवेलीचे जतन व्हावे म्हणून पुरातत्व वास्तू विभागाशी संपर्क साधला. राज्य सरकारला कपूर हवेली विकण्यासाठी अली कदर यांनी त्यांचे मूल्य दोनशे कोटी रूपये असल्याचं सांगितलं आहे. दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्या आग्रहानंतर 2018 मध्ये पाकिस्तान सरकारने कपूर हवेलीचे संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या घोषणेची पुढे अंमलबजावणी झाली नाही. पेशावरमध्ये सुमारे 1800 अशा इमारती, वास्तू आहेत ज्या किमान 300 वर्ष जुन्या आहेत .  
 Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com