TWITTER : मनीष माहेश्वरींच्या विरोधात सरकारची आता सुप्रीम कोर्टात धाव

टि्वटर आणि पोलिस यांचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-29T121400.401.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-29T121400.401.jpg

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथील एका व्यक्तीला झालेल्या मारहाणप्रकरणी टि्वटर आणि पोलिस यांचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. गेल्या आठवड्यात गाजियाबाद पोलिसांनी टि्वरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी टि्वटरचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना चैाकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविले होते. up government moves sc against order of protection by karnataka high court for twitter md maneesh maheshwari

याप्रकरणी माहेश्वरी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील कारवाईस स्थगिती दिली होती. आता उच्च न्यायालयाच्या या निकालाला आवाहन दणारी याचिका उत्तर प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. 

याप्रकरणी मनीष माहेश्वरी यांनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या याचिकेवर सुनावणी करण्यापूर्वी आपले म्हणणे न्यायालयाने समजून घ्यावे, अशी मागणी माहेश्वरी यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. गाजियाबाद येथील एका ज्येष्ठ व्यक्तीचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात टि्वटवरुन व्हायरल झाला होता. याला धार्मिक रंग दिल्याने पोलिस आणि टि्वटर यांच्यात वाद निर्माण झाला आहे. 

TWITTERचे एमडी मनीष माहेश्वरींवर गुन्हा दाखल
आपल्या वेबसाईटवरून  ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळ दाखवल्यानंतर भारताचा चुकीचा नकाशा हटविला आहे. काल रात्री उशीरा टि्वटरने ही चुक दुरुस्त केली आहे. पण टि्वटच्या अडचणी अजून संपलेल्या दिसत नाही. भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याप्रकरणे टि्वटरचे व्यवस्थापकीय संचालक (भारत) मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील बजरंग दलाचे एका नेत्याने ही तक्रार दाखल केली आहे. एनआयएच्या वृत्तानुसार, टि्वटने आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखल्याप्रकरणी मनीष माहेश्वरी यांच्यावर कलम ५०५ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कलम ७४च्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल हा प्रकार उघडकीस आला. केंद्र सरकारनेही टि्वटला या चुकीवर कारवाई होईल, असे संकेत दिले होते. 

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com