थेट राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप; खासदाराने उघडकीस केली नावं

राज्यपालविरूद्ध मुख्यमंत्री हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Governers office is his extended family says Mahua Moitra
Governers office is his extended family says Mahua Moitra

कोलकता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये सातत्याने खटके उडत असतात. बंगालमधील विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारावरूनही बरंच राजकारण झालं. धनकर यांनी थेट राज्य सरकारच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवलं. त्यावरूनही ममतादीदी यांच्यासह तृणमूलच्या नेत्यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं होता. (Governers office is his extended family says Mahua Moitra)

आता पुन्हा एका हा वाद पेटण्याची शक्यता आहे. धनकर यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करणारे ट्विट काही तासांपूर्वी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी थेट तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राज्यात कायदाच अस्तित्वात नाही. राज्यातील पोलीस कारवाई करत नाही. लोकशाहीची मुल्य पायदळी तुडवली जात आहेत. लोक पोलिसांनाच घाबरत आहेत, असे ट्विट राज्यपालांकडून करण्या आले आहे. 

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सोमवारी राज्याच्या नवीन मुख्य सचिवांना बोलावून घेतले आहे. निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावर राज्य सरकारने काय पावले उचलली, याची माहितीही राज्यपालांकडून घेतली जाणार आहे. या ट्विटनंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी रविवारी धनकर यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. 

मोईत्रा यांनी राज्यपालांच्या ओएसडीच्या नावांची यादीच ट्विटरवर टाकली आहे. यामधील काही जण राज्यपालांचे नातेवाईक आहेत, तर काही जण त्यांच्या जवळच्या परिचयातील आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. 'एक्सटेन्डेड फॅमिली' हा शब्द वापरत त्यांनी राज्यपालांवर एकप्रकारे थेट घराणेशाहीचा आरोप केला आहे. राज्यपाल त्यांच्या कुटूंबाला घेऊन दिल्लीला परत गेल्यानंतर राज्याची स्थिती सुधारेल, अशी टीका मोईत्रा यांनी केली आहे. 

दरम्यान, मोईत्रा यांनी ट्विट केलेल्या कागदपत्रांमध्ये सहा जणांची नावे आहेत. त्यामध्ये अभुद्योय सिंग शेखावत, अखिल चौधरी आणि किशन धनकर हे राज्यपालांच्या जवळचे नातेवाईक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रूची दुबे, प्रशांत दिक्षित आणि श्रीकांत जनार्दन राव हे राज्यपालांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींचे नातेवाईक असल्याचा दावाही मोईत्रा यांनी केला आहे. मोईत्रा यांच्या या ट्विटमुळे बंगालमध्ये राज्यपालविरूद्ध मुख्यमंत्री हा वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com