कुत्रा मेल्यानंतर शोक पण २५० शेतकऱ्यांच्या मृत्यूवर बोलत नाहीत! राज्यपालांची मोदींवर टीका

माझी टीका सरकारच्या जिव्हारी लागत असेल तर मी पदावरून बाजूलाहोईन, असे वक्तव्यही राज्यपालांनी केलं आहे.
Governer satyapal malik criticise PM narendra Modi over farmers protest
Governer satyapal malik criticise PM narendra Modi over farmers protest

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधीत दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीका केली.

सत्यपाल मलिक यांनी माध्यमांशी बोलताना शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. ते म्हणाले, कुत्रा मेल्यानंतही नेते शोक व्यक्त करतात. पण २५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, आतापर्यंत कुणीच दु:ख व्यक्त केले नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर तुम्ही लगेच दु:ख व्यक्त करता, पण यावर बोलत नाही, अशा शब्दांत मलिक यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. देशात कुठेही मोठी दुर्घटना झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून ट्विटरद्वारे दु:ख व्यक्त केले जाते. 

राज्यपाल राहिलो नाही तरी बोलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शेतकरी आंदोलनासंदर्भात आपण चर्चा केल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर रिकाम्या हाताने जाऊ नये. सरकारने त्यांच्याशी लवकरात लवकर खुली चर्चा करायला हवी. माझी टीका सरकारच्या जिव्हारी लागत असेल तर मी पदावरून बाजूला होईन. पण राज्यपाल राहिलो नाही तरी यावर बोलणार. माझे वक्तव्य पक्षाच्या विरोधात नाही. पण आपल्याबाजून कोणीतरी बोलत आहे, असे शेतकऱ्यांना वाटेल, असे वक्तव्यही मलिक यांनी केले आहे. 

...तर भाजपचा पराभव

शेतकऱ्यांशी ही अवस्था मी पाहू शकत नाही. भाजपचे नेते त्यांचे घर सोडू शकत नाही. आमदारांना लोक मारू लागले आहेत. हे आंदोलन अजून असेच सुरू राहिले तर भाजपचा पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरयाणात पराभव होईल, असे भाकितही मलिक यांनी वर्तवले, असे भाकितही मलिक यांनी वर्तवले.

जम्मु काश्मीर, गोवा अन् आता मेघालय

मलिक हे अनेकदा वादात सापडले आहेत. आता त्यांनी थेट केंद्र सरकारवर टीका केल्याने वाद ओढवून घेतला आहे. ते जम्मु-काश्मीरचेही राज्यपाल होते. त्यांच्याच काळात तेथील ३७० कलम हटवून दोन केंद्र शासित प्रदेश करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांत ते गोव्याचे राज्यपाल झाले. मागील अॉगस्ट महिन्यात त्यांना मेघालयचे राज्यपाल करण्यात आले. गोव्यातील भाजप सरकारशी वाद झाल्याने त्यांना मेघालयात पाठविण्यात आल्याची चर्चा होती.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com