उत्तराखंडमध्ये हाहाकार : हिमकडा कोसळल्याने 100 ते 150 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्याने अलकनंदा आणि धौलीगंगा नद्यांना अचानक महापूर आला.
Glacier breach impact fear of 100 to 150 casualties in uttarakhand
Glacier breach impact fear of 100 to 150 casualties in uttarakhand

डेहारडून : उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळल्याने अलकनंदा आणि धौलीगंगा नद्यांना अचानक महापूर आला. या दुर्घटनेत 100 ते 150 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या नद्यांच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना हलविले जात असून उत्तर प्रदेशमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे.

चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावांत आज हिमकडा कोसळला. त्यामुळे परिसरात महापूर आला आहे. अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचनाक मोठ्या प्रमाणावर वाढली. नदीव ऋषिगंगा उर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाल्याची माहिती आहे. प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या कामगार या पूरात वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, सीडीआरएफ, आयटीबीपी च्या टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत.

नदी किनारी असलेल्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. या गावांमध्ये मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे उत्तराखंडातील देवप्रयाग, कर्णप्रयाग, श्रीनगर, ऋषिकेश या बागाला मोठ्या प्रमामावर नुकसान होण्याची भिती आहे. बद्रीनाथ व तपोपनच्या परिसरात ही घटना घडली आहे. दोन पूर वाहून गेल्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी स्पष्ट केले आहे. 

संपूर्ण देश उत्तराखंडसोबत : पंतप्रधान मोदी

उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेवर सातत्याने लक्ष असून संपूर्ण भारत उत्तराखंड सोबत आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी देश प्रार्थना करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून एनडीआरएफच्या बचाव कार्याची माहिती घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर गृहमंत्री अमत शहा यांनीही उत्तराखंडला सर्व प्रकारची मदत केली जात असल्याचे सांगितले. 

महापूर ओसरतोय - त्रिवेंद्र सिंग रावत

नंदप्रयागच्या पुढे अलकनंदा नदीला आलेला पूर आता ओसरत असल्याची माहिती उत्तराखंचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी दिली. नदीच्या पाण्याची पातळी सामान्य पातळीच्या तुलनेत 1 मीटरने अधिक असली तरी ही पातळी कमी होत आहे. राज्याच्या मुख्य सचिव, आप्तकालीन विभागाचे सचिव, पोलिस अधिकारी नियंत्रण कक्षामध्ये परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com