न्याय द्या अन्यथा अंत्यसंस्कार नाही, " त्या ' पुजाऱ्याच्या नातेवाईकांचा गेहलोत सरकारला इशारा - Give justice otherwise there is no cremation, "the relatives of the priest warned the Gehlot government | Politics Marathi News - Sarkarnama

न्याय द्या अन्यथा अंत्यसंस्कार नाही, " त्या ' पुजाऱ्याच्या नातेवाईकांचा गेहलोत सरकारला इशारा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

करौली जिल्ह्यातील बूकना गावात एका पुजाऱ्याला जीवंत जाळून त्यांची हत्या करण्यात आली आहे

जयपूर : राजस्थानातील करौली जिल्ह्यात एका पुजाऱ्याच्या हत्येनंतर तेथील गेहलोत सरकारवरही टीका होऊ लागली आहे. राज्यपालांनीही या घटनेची दखल घेत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, ज्या पुजाऱ्याची हत्या झाली आहे. त्यांच्या नाईवाईकांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत जर त्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर त्या पुजाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचे ठाम आहेत. 

करौली जिल्ह्यातील बूकना गावात एका पुजाऱ्याला जीवंत जाळून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.जो पर्यंत पीडित पुजाऱ्याला न्याय मिळणार तोपर्यंत तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत या मागणीवर या गावातील गावकरीही ठाम आहेत. पीडित पुजाऱ्याच्या नातेवाईकांना पन्नास लाख देण्याबरोबरच सरकारी नाहकरी आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेहलोत सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही यासंबंधी सरकारचे प्रतिनिधी पीडित पुजाऱ्याच्या नातेवाईकांशी आणि गावकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. 

खासदार किरोडीलाल मीणा यांनी सांगितले, की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत. मी पीडित पुजाऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले, की पुजारी बाबूलाल वैष्णव यांची हत्या करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. 

दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील बलात्काराच्या घटना आणि पुजाऱ्याच्या हत्येविषयी राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपालांना सांगितले, की बलात्कार असो की पुजाऱ्याची हत्या आरोपींवर सरकार कठोर कारवाई केली जाईल. आपले सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख