'लेटर बॅाम्ब' नेते गुलाम नबी आझाद यांना कॅाग्रेसनं सामावून घेतलं..दिली नवीन असाइनमेंट.. - Ghulam Nabi gets new assignments Establishment of Congress Corona Prevention Task Force | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

'लेटर बॅाम्ब' नेते गुलाम नबी आझाद यांना कॅाग्रेसनं सामावून घेतलं..दिली नवीन असाइनमेंट..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 मे 2021

गुलाम नबींसारख्या नेत्याला काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातले नसले, तरी सध्याच्या काळात चर्चेत राहू शकेल, असे महत्त्वाचे काम देण्यात आले आहे.   

नवी दिल्ली  : देशभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कॅाग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी Sonia Gandhi यांनी कॅाग्रेसच्या कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्सची Corona Task Force स्थापना केली आहे. या टास्क फोर्सचे नेतृत्व लेटर बॅाम्बमधील (जी २३) नेते, कॅाग्रेसमधील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad यांच्याकडे यांच्याकडे देण्यात आले आहे. Ghulam Nabi gets new assignments Establishment of Congress Corona Prevention Task Force

यातील एकूण १३ सदस्यांच्या यादीत प्रियांका गांधी – वड्रा यांचे प्रमुख नाव आहे. मुकूल वासनिक, जयराम रमेश, रणजितसिंग सुरजेवाला, डॉ. अजय कुमार, पवन खेरा, मनीष छत्तर, गुरुदीपसिंग सप्पल, बी. व्ही. श्रीनिवास यांचा समावेश आहे. जी – २३ मधले दुसरे नेते पवनकुमार बन्सल यांचाही समावेश आहे. 

गुलाम नबींबरोबर जी – २३ मधील पवनकुमार बन्सय यांचाच विचार करण्यात आला आहे. जी २३ मधील अन्य नेत्यांचा विचार सध्या तरी काँग्रेस नेतृत्व करणार नसल्याचे सध्यातरी स्पष्ट झाले आहे.  गुलाम नबींसारख्या नेत्याला काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातले नसले, तरी सध्याच्या काळात चर्चेत राहू शकेल, असे महत्त्वाचे काम देण्यात आले आहे.   

कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्सच्या माध्यमातून कॅाग्रेसच्या मुख्य कार्यालय, राज्यातील कॅाग्रेस कार्यालत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सोशल मीडियाव्दारे कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना, केंद्र सरकारच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गुलाम नबी आझाद यांनी ही नवीन जबाबदारी देऊन कॅाग्रेसने पुन्हा एकदा आझाद यांना कॅाग्रेसच्या कामकाजात सामावून घेतलं आहे. 

हेही वाचा  : काँग्रेसने अशोक चव्हाणांवर सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी 
  
मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस  कमिटीने एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. देशभरात पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक   झाली. या निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एक समिती पक्षाने स्थापन केली आहे. ही समिती या निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची कारणे   शोधून त्याबाबतचा आपला अहवाल १५ दिवसांत पक्षाला सादर करणार आहे.  काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खासदार ज्योती मणी हे चार सदस्य असतील. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. 
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख