PNB गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसीला अटक..

मेहुल चोकसी यांच्या अटकेबाबत इंटरपोलने सीबीआयला कळविलं आहे.
4download_20_283_29_21.jpg
4download_20_283_29_21.jpg

नवी दिल्ली  : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी  mehul choksi हा एंटीगुआ येथून बेपत्ता झाला होता. त्याला डॅामिनिका देशातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबाबत इंटरपोलने सीबीआयला कळविलं आहे.fugitive businessman mehul choksi arrested in dominica

अँटिगुआ येथून अचानक गायब झालेला फरार भारतीय उद्योजक मेहुल चोकसी शेजारच्या डॅमिनिकामध्ये सापडला आहे. जिथून त्याला पुन्हा एंटीगुआ  येथे आणण्याची तयारी सुरू आहे. त्याला डॅमिनिकच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. मेहुल चोकसी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

तीन दिवसापासून मेहुल चोकसी हा बेपत्ता होता. याबाबत चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी.'एनआयआय' माहिती दिली होती.  विजय अग्रवाल म्हणाले की मेहुल चोकशी बेपत्ता झाल्याने त्यांचा परिवार चिंतेत आहे. मला याबाबत चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले आहे. एंटीगुआचे पोलिस मेहुल चोकसी यांचा शोध घेत होते. त्यांच्या सुरक्षिततेबाबत त्यांचे कुंटुबिय चिंतेत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले होते.  

एंटीगुआ च्या प्रसारमाध्यमानुसार,  antiguanewsroom.com पोलिसांनी मेहुल चोकशी यांचा तपास सुरु केला होता. चोकशी हा आयलॅंडच्या दक्षिण परिसरात एका हॅाटेलमध्ये जेवण करण्यासाठी रात्री उशीरा गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याच्या गाडीचा शोध सुरु आहे. मेहुल चोकसीच्या बेपत्ता घटनेबाबतपोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नव्हती. इंटरपोलने चोकसीसाठी यल्लो नोटीस बजावली होती. 

कॅरेबियन समुद्रातील डॅामिनिका हा छोटासा देश आहे. एंटीगुआ पोलिसांनी डॅामिनिका पोलिसांकडे चोकसीच्या कस्टडी मागितली आहे. डॅामिनिकन देशाला मआम्ही कळविले होते की मेहुल चोकसीला तुमच्या देशात बेकायदा प्रवेश देऊ नका. पण चोकसी त्या ठिकाणी पोहचण्यात यशस्वी ठरला.त्याला अटक करण्यात आली आहे, असे एंटीगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टॅान ब्राऊन यांनी सांगितले. 

कोणआहे मेहुल चोकशी

61 वर्षीय मेहुल चोकसी हा हिऱ्यांचा व्यापारी आहे. पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी आहे. याच प्रकरणातील आरोपी नीरव मोदी याचा तो मामा आहे. या दोघांनी मिळून बॅक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन बॅकेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. १४ हजार कोटीं रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. चोकशी हा भारतातून पळून गेला आहे. सध्या नीरव मोदी हा ब्रिटनच्या कारागृहात आहे.
 Edited by : Mangesh Mahale   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com