गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन - Former Gujarat Chief Minister Keshubhai Patel passes away | Politics Marathi News - Sarkarnama

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (वय 92) यांचे आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसापासून अहमदाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू होते.

अहमदाबाद  : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (वय 92) यांचे आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसापासून अहमदाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. केशुभाई यांनी दोनवेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. गेल्या 30 सप्टेंबर रोजी सोमनाथ मंदीर ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती.  

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दोन वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले केशुभाई यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 2001 मध्ये त्यांच्याजागी नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. मोदी त्यांना आपले राजकीय गुरू मानतात. पंतप्रधान झाल्यावर मोदींनी म्हटले होते की गुजरातमधील भाजपचा रथ हाकण्याची जबाबदारी केशुभाई पटेल यांच्यावर आहे. 

केशुभाई पटेल यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात 1960 मध्ये जनसंघ कार्यकर्ता म्हणून केली होती. जनसंघाचे ते संस्थापक सदस्य होते. 1977 मध्ये  केशुभाई पटेल हे राजकोट लोकसभा मतदार संघातून निवडणूक आले होते. त्यानंतर काही दिवसात त्यांची राजीनामा दिला होता. 

संबंधित लेख