सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांचे निधन - Former Chief Minister Virbhadra Singh passes away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंह यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

वीरभद्र सिंह नऊ वेळा आमदार तर सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री  होते

नवी दिल्ली : हिमाचलप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री वीरभद्र सिंह (वय ८७) यांचे निधन झाले. प्रकृती खालावल्याने आज पहाटे त्यांना साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिमल्याच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. Former Chief Minister Virbhadra Singh passes away

ते नऊ वेळा आमदार तर सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. तसेच पाच वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. सध्या ते अरकी विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. 

गेल्या काही दिवसापासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी दोन वेळा कोरोनावर मात केली होती. काल दुपारी त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले. 

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांनी ओळख होती. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांना राजकारणात आणले होते. याचा उल्लेख वीरभद्र सिंह हे कार्यक्रमात नेहमी करीत असत. मनमोहन सिंगाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते केंद्रीयमंत्री होते. 

धक्कादायक : जादा बिलासाठी मृताला 'जिवंत' केलं! 
 सांगली : मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार सांगलीच्या Sangli  इस्लामपुरात उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. वाठारकर  Dr. Yogesh Watharkar याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख