माजी मुख्यमंत्री दहावीची परिक्षा देतात तेव्हा... 

बारावीचा निकाल मिळवण्यासाठीच चौटाला दहावीच्या परीक्षेसाठी पोहोचले होते.
Omprakash Chautala .jpg
Omprakash Chautala .jpg

नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला (Omprakash Chautala) यांनी बुधवारी दहावीची परीक्षा दिली आहे. दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा देण्यासाठी ओमप्रकाश चौटाला परीक्षा केंद्रावर पोहचले होते. सिरसा येथील आर्य कन्या वरिष्ठ माध्यमिक शाळेत चौटाला यांनी इंग्रजीचा पेपर दिला. (Former Chief Minister gave 10th exam) 

ओमप्रकाश चौटाला यांनी मागील वर्षी हरियाणा ओपन बोर्डाकडून बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, त्यांनी दहावीची इंग्रजीची परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने ५ ऑगस्टला १२ वीचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. बारावीचा निकाल मिळवण्यासाठीच चौटाला दहावीच्या परीक्षेसाठी पोहोचले होते.

परीक्षा केंद्रावर प्रसारमाध्यांना चौटाला यांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ''मी विद्यार्थी आहे, नो कमेंट्स'' म्हणत त्यांनी बोलणे टाळले. यानंतर ८६ वर्षीय ओमप्रकाश चौटाला परीक्षा देण्यासाठी गेले. चौटाला यांनी शिक्षण विभागाकडे पेपर लिहिण्यासाठी लेखकाची मागणी केली होती. त्यांची ही मागणी शिक्षण विभागाने पूर्ण केली केली. दोन तासात त्यांनी पेपर पूर्ण केला. 

जेबीटी घोटाळ्याची शिक्षा भोग असताना २०१३ ते २०२१ दरम्यान ओमप्रकाश चौटाला यांनी तिहार जेलमध्ये परीक्षेचा अभ्यास केला होता. २०१७ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलमधून उर्दू, सायन्स, सोशल स्टडीज आणि इंडियन कल्चर अॅण्ड हेरिटेज विषयांमध्ये ५३, ४ टक्के गुण मिळवले होते.      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com