परराष्ट्रमंत्र्याच्या मुलाला चिनी दूतावासाकडून निधी... 

आता स्वयंघोषित देशभक्त चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे गोष्टी करतात. त्यांनी आरोप केला आहे की परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे पुत्र ध्रुव यांच्या संस्थेला चीनकडून तीन कोटी रूपयांचे दान मिळाले आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhad

मुंबई : भारत-चीनच्या संघर्षावरून सध्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सध्या सुरू आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निश्चय करणारी पत्र आल्याचा उल्लेख  'मन की बात' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.  कॅाग्रेसला चिनी वस्तूंवर राजकारण न करण्याचा सल्ला मोदी यांनी दिला आहे. तर आता राष्ट्रवादी कॅाग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात याबाबत टिका केली आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेसचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की आता स्वयंघोषित देशभक्त चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे गोष्टी करतात. त्यांनी आरोप केला आहे की परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे पुत्र ध्रुव यांच्या संस्थेला चीनकडून तीन कोटी रूपयांचे दान मिळाले आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे. ते म्हणतात की डोभाल यांच्या संबधीत संस्था एका चीनी संस्थेकडून डोनेशन स्वीकारले आहे. डोभाल आता चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे गोष्टी करतात. आश्चर्य़ाची गोष्ट आहे की ते चीनच्या संघर्षावरून कॅाग्रेसवर टिका करीत असतात.

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हटले होते की चीनबाबतच्या संघर्षाचे राजकारण करू नये.  पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे नाव न घेता कॅाग्रेसवर याबाबत टिका केली होती. ते म्हणाले होते की आम्हाला 1962 च्या संघर्षाला विसरून चालणार नाही. चीनच्या हल्ल्यात गलवान येथे 20 भारतीय जवान शहीद झाले होते. यावर कॅाग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी भाजपवर टिका केली होती. 
  

राजीव गांधी फाउंडेशनला चीनच्या संस्थांकडून निधी मिळाल्याचा आरोप करुन काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनीशी निगडित व्यक्ती आणि संस्थांना चीनकडून निधी मिळत असल्याची खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.  गल्वान खोऱ्यातील संघर्ष आणि चीनने लडाखमध्ये केलेली घुसखोरी या मुद्द्यांवरुन काँग्रेसने भाजप सरकारला धारेवर धरले आहे. यावरुन भाजपने राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून निधी मिळाल्याचा आरोप केला होता. हे आरोप करताना भाजपने त्यांचे नेते आणि त्यांच्याशी निगडित संस्था यांचा विसर पडल्याचे चित्र आहे. भाजप नेत्यांशी निगडित संस्थांना चीनकडून निधी मिळत असल्याचे समोर आले आहे. 

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे पुत्र ध्रुव यांच्याशी निगडित द ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडशेनला चिनी दूतावासाकडून निधी मिळाला आहे. परराष्ट्र धोरणाशी निगडित हा थिंक टँक आहे.  याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजचे आर्थिक पाठबळ या संस्थेला आहे. अमेरिकेच्या पुढाकाराने सुरु असलेल्या या संस्थेच्या संचालकपदी मागील वर्षी ध्रुव जयशंकर यांची निवड झाली होती. जयशंकर हे आधी भारताचे चीनमध्ये राजदूत होते. ते या संस्थेत अनेकवेळा व्याख्यान देण्यास जातात.

संस्थेला चीनच्या दूतावासाकडून 2016 आणि 2017 मध्ये अनुक्रमे 1.25 कोटी आणि 50 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल संस्थापक संचालक असलेला विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन हा आणखी एक थिंक टँक आहे. याच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार चीनच्या परराष्ट्र आणि सामरिक धोरणाशी निगडित नऊ संस्थांकडून देणगी मिळाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com