पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पाच 'एम' फैक्टरची जादू... - five m factor in west bengal election | Politics Marathi News - Sarkarnama

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पाच 'एम' फैक्टरची जादू...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

ममता, महिला, मुस्लिम, मातुआ समाज यांनी तृणमूल कॅाग्रेसला विजयी केले.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल कॅाग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत पाच 'एम' फैक्टरची जादू चालली. हे पाच 'एम' बंगालच्या निवडणुकीचे महत्वाचे ठरले. हे पाच एम आहेत. ममता, मोदी, महिला, मुस्लिम, मातुआ समाज. यातील चार 'एम'ने ममता, महिला, मुस्लिम, मातुआ समाज यांनी तृणमूल कॅाग्रेसला विजयी केले. तर भाजपच्या एक 'एम'ने  (मोदी) आपली सर्व ताकदपणाला लावली.   

मातुआ समाज- बंगालमध्ये या समाजाचा फार प्रभाव आहे. या समाजाचे बंगालमध्ये ३० लाख नागरिक आहेत. बांग्लादेशचा  सीमा परिसर, चार लोकसभा मतदार संघ, आणि ३० ते ४० विधानसभा मतदारसंघात मातुआ समाजाचे मतदान निर्णायक ठरते. हा समाज १९५० पासून पाकिस्तानातून तर आता बांग्लादेशातून बंगालमध्ये पलायन करीत आहे. भाजपने या समाजाशी जवळीक साधण्याचा  प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. 

ममता बॅनर्जी - तृणमूलच्या सर्वेसर्वा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला दबदबा कायम ठेवला. बंगालमध्ये ममतादीदींनी 'खेलो होबे' या नारा देत नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासाठी लक्ष्मण रेषा आखली. ती लक्ष्मण रेषा मोदी-शाह यांना ओलांडणे शक्य झाले नाही. प्रचारादरम्यान ममतादीदींच्या पायाला दुखापत झाली होती, हा  भावनिक मुद्दाही निवडणुकीत होता.

महिला- ममता दीदींच्या प्रचाराची सर्व मदार महिलांवर होती. रॅली असो की रोड शो महिला नेहमीच अग्रेसर होत्या.  प्रचारातील ही महिला शक्तीचा मोठा वाटा टिएमसीच्या विजयात आहे.

मुस्लिम मतदार- बंगालमध्ये एका दशकापासून मुस्लिम व्होट बॅंक ममतांकडे आहे. यंदाही मुस्लिम मतदारांनी दीदींना भरभरुन साथ देत टिएमसीला विजयी केले. एमआईएमआईएमचा प्रभाव बंगालच्या निवडणुकीत दिसला नाही. मतदारांनी त्यांना नाकारले आहे. 

मोदी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीमुळे बंगालमध्ये भाजपचे वातावरण निर्माण केले होते. लोकसभेत भाजपला तीनच जागा मिळाल्या होत्या. विधानसभेत भाजपने दोन अंकी आकडा गाठला. ममता बॅनर्जींना रोखण्याचा प्रयत्न मोदींनी केला, पण भाजपचा उमेदारांना बंगाली जनतेने नाकारले. बंगालमध्ये ८० जागा भाजपला मिळाल्या, त्याचे श्रेय मोदींनाच आहे.     

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख