जगात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या पुरुषाचा मृत्यू.. - first male to take corona jab william shakespeare dies | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

जगात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या पुरुषाचा मृत्यू..

वृत्तसंस्था
बुधवार, 26 मे 2021

फायझर-बायोटेकची सर्वात प्रथम लस ८१ वर्षीय विल्यम शेक्सपियर  यांनी घेतली होती.

कॉव्हेन्ट्री (लंडन)  : कोरोना जगभरात पसरायला २०१९ मध्ये सुरवात झाली. डिसेंबर २०२० मध्ये त्यावरील लस उपलब्ध झाली. फायझर-बायोटेकची सर्वात प्रथम लस ८१ वर्षीय विल्यम शेक्सपियर William Shakespeare यांनी घेतली होती. त्यांचे आज निधन झाले. जगातील कोरोना लशीचा पहिला डोस घेणारे ते पहिले व्यक्ती आहे. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे त्यांच्या कुंटुबियांनी म्हटलं आहे. सर्वांनी लस घेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांच्या कुंटुबियांनी म्हटलं आहे.  first male to take corona jab william shakespeare dies

डिसेंबर 2020 मध्ये शेक्सपियर यांनी कोव्हेंट्री रुग्णालयात कोरोनाची पहिली लस घेतली होती. त्यांनी लस घेण्याच्या काही मिनिटांपूर्वी मार्गारेट केनेन या ९१ वर्षीय महिलेने कोरोनाचा डोस घेतला होता. त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. विल्यम यांचे निधन स्ट्रोकमुळे झाले असल्याचे यूनिवर्सिटी हॅास्पिटलने म्हटलं आहे. विल्यम यांच्या मागे पत्नी जॅाय, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे. 

'बीबीसी'ने याबाबतचे वृत्त दिले आहे, या वृत्तानुसार, सर्वांनी लस घेणे हीच शेक्सपियर यांना खरी श्रद्धांजली असेल. त्यामुळे सर्वांनी करोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे. शेक्सपियर यांनी जवळपास तीन दशके समाजसेवा केली आहे.

रोल्स रॉयसचे माजी कर्मचारी आणि तेथील रहिवासी काउन्सिलर असणाऱ्या शेक्सपियर यांचे दीर्घ आजारामुळे युनिव्हर्सिटी हॉस्पिटल कॉव्हेंट्री याठिकाणीच निधन झाले, अशी माहिती डेली मेलने दिली आहे. याच ठिकाणी त्यांनी लस घेतली होती.

 
हेही वाचा  : रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ ; IMA कडून १ हजार कोटींचा मानहानी दावा.. 

मुंबई : अॅलोपथी औषध, आणि डॉक्टरांवर टीका करून डॉक्टरांना २५ प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान करणाऱ्या योगगुरु रामदेव बाबा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तराखंडच्या इंडिअन मेडिकल असोसिएशन शाखेकडून (IMA) रामदेव बाबांवर १ हजार कोटींचा मानहानी दावा करण्यात आला आहे. आयएमएने रामदेव बाबांना याबाबतची नोटीस पाठविली आहे. असोसिएशनचे सचिव डॉ. अजय खन्ना म्हणाले की, रामदेव बाबांना अॅलोपथी मधले अ सुद्धा माहिती नाही. आम्ही त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ पण त्यापूर्वी त्यांनी आपली योग्यता सिध्द करावी. आम्ही रामदेवबाबांना १५ दिवसाची मुदत दिली आहे. या वेळात त्यांनी केलेल्या विधानांबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख