भाजपचे माजी आमदार बैठकीतच भिडले; एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण - Fighting among BJP workers at the meeting  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे माजी आमदार बैठकीतच भिडले; एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचल्यानंतर त्यांनी चौकशी सुरु केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गाझियाबाद येथे भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपची (BJP) ही  बैठक व्हर्चूअल माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यालयामध्ये जमलेल्या काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यांनी लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना घडली. ही मारहाण एवढी गंभीर स्वरुपाची होती की मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांला रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. (Fighting among BJP workers at the meeting)  

या प्रकरणामध्ये मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याने सिहानी गेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचल्यानंतर त्यांनी चौकशी सुरु केली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत कोणतीही कारवाई पक्षाने केलेली नाही.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसची नव्हे तर भाजपची मते फुटतील!

शुक्रवारी भाजपच्या कार्यकारणीची व्ह्यर्चूअल बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकिसाठी गाझियाबादमधील प्रदेश कार्यकारणीमधील सर्व सदस्यांना नेहरु नगरमधील पक्ष कार्यालयामध्ये बोलवण्यात आले होते. त्यावेली भाजप प्रदेश समितीचे सदस्य पृथ्वी सिंह आणि पवन गोयल यांच्यामध्ये शहरातील विधानसभा क्षेत्रासंदर्भात बोलणे सुरु होते. या दोघांची चर्चा सुरु असतानाच माजी आमदार प्रशांत चौधरी तेथे आले. त्यावर पवन गोयल यांनी तुम्ही कशाला मध्ये बोलत आहात असा प्रश्न चौधरी यांना विचारला. या प्रकरणानंतर गोयल यांचा भाऊ मनीष यांनी पोलिसांकडे भाजप नेते आणि माजी आमदार प्रशांत चौधरींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्हाअंतर्गत तक्रार दाखल केली.

हेही वाचा : आघाडी सरकारच्या विरोधात आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

भाजप नेते पवन गोयल यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांच्या समर्थकांनी लोकांनी निषेध नोंदवला आहे. अखिल भारतीय वैश्य समाज या संघटनेचे कार्यकर्ते गायत्री रुग्णालयाच्या परिसरामध्ये आंदोलनाला बसले आहेत. वीके अग्रवाल, नंदकिशोर नंदी यांच्यासहीत अनेक लोकांनी रुग्णालयाच्या परिसरात घोषणाबाजी केली. पक्ष जोपर्यंत चौधरी यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसल्याचे अग्रवाल म्हणाले. या प्रकरणामध्ये पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख