कंगनाची जीभ पुन्हा घसरली...शेतकऱ्यांना म्हणाली, हे तर दहशतवादी - Farmers are terrorist says Kangna Ranawat on pop star Rihanas support | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाची जीभ पुन्हा घसरली...शेतकऱ्यांना म्हणाली, हे तर दहशतवादी

वृत्तसंस्था
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

हॉलिवूडची पॉप स्टार रिहानानं भारतातील आंदोलक शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच भडकली आहे.

नवी दिल्ली : हॉलिवूडची पॉप स्टार रिहानानं भारतातील आंदोलक शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच भडकली आहे. रिहानाला प्रत्युत्तर देताना तिनं आंदोलक शेतकऱ्यांचा उल्लेख पुन्हा दशहतवादी असा केला आहे. कंगनाच्या या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे.

कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने सीमेवरील सुरक्षा कडक केली आहे. या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर कंगना राणावत सुरूवातीपासूनच या आंदोलनाच्या विरोधात आहे. आंदोलक शेतकरी दहशतवादी असल्याचा आरोप तिने यापूर्वीही केला आहे. 

आता हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केलं आहे.  तिने ट्विटरवर एक बातमी शेअर केली आहे. यात आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे.

हानाने या न्यूज बरोबर ''यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत'' कॅप्शनमध्ये लिलिले आहे. रिहानानंतर आता स्वडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनीही शेतकर्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. आम्ही भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 

रिहानाच्या ट्विटनंतर कंगनानेही तिला ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणते, ''याविषयी कोणीच काही बोलणार नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहे. भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर चीन विभाजन झालेल्या भाग ताब्यात घेवून तिथे चायनीज कॉलनी उभारेल.

तुमच्यासारखा आम्ही आमचा देश विकत नाही,'' असे कंगनाने म्हटले आहे. यावरच न थांबता कंगनाने एकामागोमाग एक ट्विटची मालिकाच सुरू केली आहे. रिहानावर अनेक वादग्रस्त आरोप तिने केले आहेत. खलिस्तानीशी संबंध असल्याचा आरोप करून त्यासोबत काही छायाचित्र टाकली आहेत. 

शेतकरी आंदोलनावरून कंगना नेहमीच केंद्र सरकारची बाजू घेतली आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवरही तिने टीका केली आहे. पंजाबी अभिनेता दलजित दुसांज यांच्यामध्येही ट्विटर वॉर रंगले होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख