गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी पीडित मुलीच्या आईवडिलांना कोंडले, राहुल गांधींचा आरोप 

या सर्व घडामोडीची दखल राहुल गांधी यांनी आज पंजाबमधील शेतकरी आंदोलनात घेत योगी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.
गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी पीडित मुलीच्या आईवडिलांना कोंडले, राहुल गांधींचा आरोप 

अमृतसर : यूपीत एका निरपराध युवतीची हत्या होते. ज्यांनी तिला मारले त्यांच्यांविरोधात कारवाई होत नाही. उलट त्या अभागी पीडितेच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना घरात कोंडून ठेवले जाते. असा घटना येथे होतात. गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी ज्यांचा काही दोष नाही अशांवर कारवाई केली जात आहे हे धक्कादायक आहे असा हल्लाबोल कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी भाजपवर केला आहे. 

यूपीतील हाथरसप्रकरणाने देश हादरला. एका निष्पाप युवतीचा काही दोष नसताना तिची हत्या केली. ज्या नराधमांनी तिच्यावर जीवघेणा हल्ला केला ती पीडित युवती काही दिवस मृत्यूशी झूंज देत होती. शेवटी तिने उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. या पीडितेचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात होता. तिचा मृतदेड गावात आणण्यात आणल्यानंतर तिच्या आईवडिलांना आपल्या मुलीचा चेहराही पाहू दिला नाही यावरून संतापात अधिकच भर पडली. 

यूपी पोलिसांच्या दादागिरीचा सर्वत्र निषेध होऊ लागला. या घटनेनंतर राहुल आणि प्रियंका गांधी हाथरसकडे रवाना झाले मात्र त्यांनाही अडविण्यात आले. राहुल यांना तर धक्काबुक्की करण्यापर्यंत यूपी पोलिसांची मजल गेली. शेवटी राहुल आणि प्रियंका पीडितेच्या गावात गेले त्यांना भेटून आले. 

या सर्व घडामोडीची दखल राहुल गांधी यांनी आज पंजाबमधील शेतकरी आंदोलनात घेत योगी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने आणलेल्या कृषि विधेयकाचा निषेधार्थ कॉंग्रेसने आज मोगा येथे " खेती बचाओ यात्रा' आयोजित केली आहे. या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, खासदार नवज्योतसिंग सिद्धू आदी नेते यावेळी उपस्थित होते. 

राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि यूपीतील योगी आदित्यनाथ सरकारवर कडाडून हल्ला चढविला. ते म्हणाले, 
""यूपीत काय चालले आहे. एका निरपराध युवतीची हत्या होते. ज्यांनी तिला मारले त्यांच्यांविरोधात कारवाई होत नाही. उलट त्या अभागी पीडितेच्या आईवडीलांना आणि नातेवाईकांना कोंडून ठेवले जाते. असा घटना येथे होतात. गुन्हेगारांना शासन करण्याऐवजी ज्यांचा काही दोष नाही अशांवर कारवाई केली जात आहे हे धक्कादायक आहे 

हे ही वाचा: 
तृणमूलला शंभरही जागा मिळणार नाहीत : विजयवर्गीय 
इंदूर : काही लोकांसाठी पक्ष प्रथम आणि देश नंतर आहे. त्यामुळे देशातील जनता अशा पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना नाराकरत आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसला शंभर जागाही मिळणार नाहीत असा दावा भाजपचे नेते आणि पश्‍चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे. 

कैलाश यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की मी मध्यप्रदेशचा असलो तरी अधिक काळ पश्‍चिम बंगालमध्येच असतो. त्यामुळे येथील परिस्थिती पाहता ती छातीवर हात ठेवून सांगतो की आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅंनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाला शंभरही जागा मिळणार नाहीत. सत्ता येणार नसल्यानेच ममता बॅनर्जी चिंतेत आहेत. त्यांना खुर्चीची चिंता लागून राहिली आहे देशाची नाही. 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने या राज्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. येथे कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेवर आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. या राज्यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी विशेषत: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com