धक्कादायक : डॅाक्टरांकडूनच 'ब्लॅक फंगस'वरील बनावट इंजेक्शनची विक्री - Fake Black Fungus Injections Found In Delhi Doctor's House | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

धक्कादायक : डॅाक्टरांकडूनच 'ब्लॅक फंगस'वरील बनावट इंजेक्शनची विक्री

वृत्तसंस्था
रविवार, 20 जून 2021

पोलिसांनी दोन डॅाक्टरांसह दहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 हजार 293 बनावट इंजेक्शन जप्त केली आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुटवड्यामुळं रेमडेसिविरसह व इतर काही औषधांचा मोठा काळा बाजार झाला. आता म्युकरमायकोसिस आजारावरील अॅम्फोटेरिसीन-बी (Amphotericin-B) हे औषध मिळण्यातही अडचणी येत आहेत. याचाच गैरफायदा घेतला जाऊ लागला आहे. दोन डॅाक्टरांकडूनच या औषधाच्या नावाखाली बनावट औषधांची विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडून तब्बल तीन हजारांहून अधिक इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. (Fake Black Fungus Injections Found In Delhi Doctor's House)

दिल्ली पोलिसांनी बनवाट इंजेक्शनच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन डॅाक्टरांसह दहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 हजार 293 बनावट इंजेक्शन जप्त केली आहेत. डॅा. अल्तामस हुसेन याच्या घरात ही इंजेक्शन सापडली आहेत. यामध्ये काही रेमडेसिविर इंजेक्शनही सापडली आहेत. काही इंजेक्शनची मुदत संपून गेल्याचेही आढळून आल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी सांगितलं. 

हेही वाचा : कोरोना लसीकरणात भारत चीनपेक्षा चारपटीने मागे

या टोळीने जवळपास 400 बनावट इंजेक्शनची विक्री केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. त्यांच्याकडून एका इंजेक्शनची विक्री 250 ते 12 हजार रुपयांना केली जात होती. सध्या देशभरात या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. याचा गैरफायदा या टोळीकडून घेतला जात होता. 

दरम्यान, काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या रुग्णांना अॅम्फोटेरिसीन-बी (Amphotericin-B) हे इंजेक्शन मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एका रुग्णाला सुमारे 50 ते 100 इंजेक्शन लागत असून, एका इंजेक्शनची किंमत सहा ते आठ हजार रुपये आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शन दिली जात आहेत. 

कोरोनातून बरे झालेले रुग्ण आधीच उपचारासाठी खर्च केल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात. यातच म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यासह कुटुंबीयांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. एक तर इंजेक्शन मिळत नाही आणि मिळाले तरी परवडत नाही, अशी अवस्था अनेकांची होत आहे. रुग्णावर उपचारासाठी इंजेक्शनसाठीच सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च होत आहे. गरीब रुग्णांना हा खर्च परवडण्यासारखा नाही. 

देशातील बहुतेक राज्यांनी याला साथीचा रोग जाहीर केला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात यावरील उपचार मोफत होतात. परंतु, खासगी रुग्णालयात यावर उपचारासाठी मोठा खर्च हत आहे. खासगी रुग्णालयात एका रुग्णाचे बिल 10 ते 15 लाख रुपये होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख