#ResignModi ब्लॅाक; सरकारच्या सांगण्यावरून की चुकून...फेसबुकने केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा मागणाऱ्या अनेक पोस्ट #ResignModi हा हॅशटॅग वापरूनपोस्ट केल्या जात आहेत.
Facebook blocked posts tagged #ResignModi amid covid crisis
Facebook blocked posts tagged #ResignModi amid covid crisis

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत असून तीन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयातील बेड, अॅाक्सीजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यावरून विरोधी पक्षांसह अनेकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. तसेच सोशल मीडियावर #ResignModi हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा मागणाऱ्या अनेक पोस्ट #ResignModi हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. कोरोना काळात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका अनेकांनी आपल्या पोस्टमध्ये ठेवला आहे. तसेच कोरोना वाढत असताना पंतप्रधान पाच राज्यांतील निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होते, अशा पोस्टही टाकल्या जात आहेत. 

या हॅशटॅगवरून आता वाद निर्माण झाला आहे. फेबबुकने अचानक या हॅशटॅगसह संबंधित काही पोस्ट ब्लॅाक केल्या. त्यावरून पुन्हा सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी फेसबुकला धारेवर धरले. केंद्र सरकारच्या सांगण्यावरूनच फेसबुकने हा हॅशटॅग हटविल्याची टीका होऊ लागली. या टीकेनंतर फेसबुकने पुन्हा काही तासांतच हा हॅशटॅग रिस्टोर केला. 

फेसबुककडून विविध कारणांमुळे हॅशटॅग तसेच काही खाती ब्लॅाक केली जातात. केंद्र सरकारकडूनही अनेकदा तशी माहिती देण्यात येती. काही हॅशटॅग किंवा खाती जाणीवपूर्वक तर काही खाती अॅाटोमेटेड गाईडलाईन्सनुसार आपोआप ब्लॅाक होतात. #ResignModi हा हॅशटॅग ब्लॅाक झाल्यानंतर फेसबुकने खुलासा केला की, हा हॅशटॅग चुकून ब्लाॅक झाला होता. भारत सरकारने याबाबत सांगितले नव्हते. त्यामुळे हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडूनही याबाबत खुलासा करण्यात आला आहे. हॅशटॅग हटविण्याबाबत सरकारकडून फेसबुकला काही सांगण्यात आले नाही. फेसबुकनेही हे चुकून झाल्याचा खुलासा केला आहे, असे सरकारकडूनही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com