रेमडेसिविरबाबत मोठा निर्णय; केंद्र सरकारने केली घोषणा...

कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन फायदेशीर ठरत असल्याने त्याची मागणी वाढली आहे.
Export of injection Remdesivir prohibited till the COVID19 situation
Export of injection Remdesivir prohibited till the COVID19 situation

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णालयात दाखल होणारे रुग्णही वाढल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीही वेगाने वाढत आहे. परिणामी, देशात अनेक ठिकाणी रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. देशात या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने आज रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातल्याची घोषणा केली आहे. देशात कोरोना कहर सुरू असेपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन फायदेशीर ठरत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. मात्र, गरज नसलेल्या रुग्णांनाही हे इंजेक्शन दिले जात असल्याचे समोर आले आहे. मागणी वाढल्याने इंजेक्शनचा काळाबाजारही सुरू झाला आहे. रुग्णांना एका इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत आहे. पण अनेकांना इंजेक्शन मिळत नाही. 

रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आज या इंजेक्शनसह त्यातील घटकांची निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. देशात दर महिन्याला 38 लाख 80 हजार इंजेक्शन उत्पादित करण्याची औषध कंपन्यांची क्षमता आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळेल, यादृष्टीने पावले टाकली जात असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले आहे. 

संकेतस्थळावर माहिती झळकणार

रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर सर्व वितरकांची माहिती प्रसिध्द करण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णालये व कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ही माहिती उपलब्ध होऊ शकेल. ही माहिती शासकीय व खासगी रुग्णालयांपर्यंत पोहचवावी, अशा सुचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. 

औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी साठा आणि वितरणाबाबतची तपासणी करावी. तसेच इंजेक्शनच्या काळाबाजारावरही लक्ष ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्याबाबत सर्व कंपन्यांना सांगण्यात येणार आहे. याबाबत केंद्राकडून पावले टाकण्यात आली आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com