Explosion at a thermal plant in Tamil Nadu | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज : तामिळनाडूच्या थर्मल प्लांटमध्ये स्फोट; अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

तामिळनाडूमधील न्यूवेली थर्मल प्लांटच्या स्टेज-2 चा बॉयलरचा आज (ता. 1 जुलै) सकाळी स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. 

चेन्नई : तामिळनाडूमधील न्यूवेली थर्मल प्लांटच्या स्टेज-2 चा बॉयलरचा आज (ता. 1 जुलै) सकाळी स्फोट झाला आहे. या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. 

सध्या 17 जखमींना एनएलसी लिग्नाइट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. या प्लांटमध्ये कोळशापासून वीज तयार केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या थर्मल प्लांटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

दरम्यान, अद्यापपर्यंत स्थानिक प्रशासनाने किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते प्लांटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख