योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही...

सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही.
3Ayodhya.jpg
3Ayodhya.jpg

लखनौ : अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला सर्व धर्मीय लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गरज पडल्यास या यादीत फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तयार केलेल्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता देशातील एकाही मुख्यमंत्र्यांला निमंत्रण नाही. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने शिवसैनिकांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि अयोध्या रामजन्मभूमीचं भावनिक नातं आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनीही अयोध्या आणि शिवसेनेचे नातं पुढे टिकवून ठेवलं. मात्र, तरी देखील उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं नाही.

एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागेल. निवडक मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिल्यास वाद उद्भवू शकतो. आणि सध्याच्या लॉकडाउनच्या काळात सर्व मुख्यमंत्र्यांना बोलवणे शक्य नाही. म्हणून केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. भूमिपूजनाला सर्व धर्मांच्या आचार्यांना बोलण्याचा निर्णय झाला आहे. राममंदिर केसचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांचंही नाव पाहुण्यांच्या यादीत आहे. 


बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाचे काही विशेष मान्यवरांना बोलावण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाह निमंत्रण आहे. अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचं नाव या यादीत सामील आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे. योगगुरु बाबा रामदेव यांचंही नाव यामध्ये आहे.
 
देशात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भूमिपूजन कार्यक्रमाला कमीत कमी जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मंदिराची जबाबदारी असलेल्या राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टतर्फे काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता अयोध्येतील नागरिकांनी या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला हे आवाहन केले आहे. अयोध्येत येत्या ५ आॅगस्टला होणाऱ्या राममंदीराच्या भूमीपुजन कार्यक्रमाच्यावेळी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. तसेच १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनीही हल्ला होण्याची शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे. 

पाच आॅगस्ट रोजी अयोध्येत प्रस्तावित राममंदिराचे भूमीपुजन केले जाणार आहे. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या घटनेची याच दिवशी वर्षपूर्ती होत आहे. त्यामुळे हा हल्ला होऊ शकतो, असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. त्यामुळे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. अयोध्येत होणाऱ्या भूमीपुजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, राममंदीर आंदोलनाशी संबंधित नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. 

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'ने या हल्ल्याची तयारी केली असून जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनांचे अतिरेकी अयोध्येत घातपात घडवण्याच्या दृष्टीने भारतात घुसवले असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार तीन ते पाच जणांच्या गटांमध्ये हे अतिरेकी पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक गटाने स्वतंत्र ठिकाणी स्वतंत्रपणे हल्ला करावा, जेणेकरुन हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे वाटेल, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.
Edited  by : Mangesh Mahale 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com